वारकऱ्यांच्या सेवेसाठी सवंगडी सज्ज-सातत्यपूर्ण सेवेचे १० वे वर्ष

63

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(अनिल साळवे)

गंगाखेड(दि.17जून):-प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील संत जनाबाई मंदिर व परिसरात पंढरपूर ला विठुरायाच्या दर्शनासाठी विदर्भ व उत्तर मराठवाड्यातून निघालेल्या पायी दिंड्या रात्रीच्या मुक्कामी थांबतात.थकल्या, भागलेल्या वारकऱ्यांसाठी गंगाखेड शहरातील सवंगडी कट्टा सामाजिक समूह वारकरी आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करणार आहे.सेवेचे हे त्यांचे १० वे वर्ष असून सर्व महिला व पुरुष सवंगडी वारकऱ्यांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत.

 आषाढी एकादशी निमित्य विदर्भातून पायी पंढरपूर जाणाऱ्या बहुतांश दिंड्या संत जनाबाई चे जन्मस्थान असलेल्या गंगाखेड येथे मुक्कामी असतात, येथील त्यांचा विसावा आनंदात जावा यासाठी विविध क्षेत्रातील पुरुष व महिलांनी एकत्र येत सवंगडी कट्टा स्थापन करून त्या माध्यमातून वारकरी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.ज्यामध्ये सवंगडी कट्याच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून आरोग्य तपासणी होऊन वारकऱ्यांना आवश्यक ती मोफत औषधी दिली जाते. तसेच त्यांच्या हातापायाची मसाज सुद्धा केली जाते. ज्यामध्ये इलेक्ट्रिकल व हॅन्ड मसाज चा समावेश आहे.वारकरी सेवेसाठी शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या टीम सोबतच सेवांकुर संस्थेच्या डॉक्टरांचा सुद्धा सहभाग आहे.   

सदरील आरोग्य सेवा शिबिराची सुरुवात १८जून रोजी होत असून सांगता २४जुन रोजी होणार आहे. शिबिराचे उद्घाटन प.पू.यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे काका तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुशील राठी,डॉ.रामेश्वर नाईक,डॉ.केदार खटिंग,डॉ.हेमंत मुंढे,डॉ.किशन गारोळे,डॉ.बागेश्री भरड,मा.घनश्याम मालपाणी हे राहणार आहेत. 

      आरोग्य सेवा शिबिराचा मुक्कामी येणाऱ्या हजारो वारकऱ्यांना लाभ होणार असून जनाबाई च्या पावन भूमीतील वारकऱ्यांचा मुक्काम अविस्मरणीय होणार आहे.प्रतिवर्षी प्रमाणे कट्टयातील सदस्यांनी वर्गणी करून वारकऱ्यांसाठी भरपूर औषधीसाठा उपलब्ध केलेला आहे.तरी सदरील शिबिराचा वारकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक प्रकाश घन, रमेश औसेकर,मनोज नाव्हेकर यांनी केलं आहे.

शिबीर यशस्वीतेसाठी सवंगडी,डॉ.किशोर कुगणे,डॉ.योगेश मल्लूरवार,डॉ.देविदास चव्हाण,डॉ.संजय भरड,डॅा.अनिल बर्वे, डॉ.सौ.शोभा काबरा,डॉ.सौ.बागेश्री भरड,अतुल तुपकर,संतोष तापडीया,नागेश पैठणकर,गजानन महाजन,ॲड.पंकज भंडारी, अक्षय जैन,नंदकुमार सोमाणी,सचिन नाव्हेकर, भगत सुरवसे,कारभारी निरस,संदीप कोटलवार,संजय तापडीया,नागेश कोनार्डे,गोविंद रोडे,गजानन भारती, ऋषी काबरा,पुरुषोत्तम भंडारी, जगदिश तोतला, मकरंद चिनके प्रयत्नशील आहेत.