म्हसवड पोलीस स्टेशन बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्काराने सन्मानित

71

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)

▪️सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन बद्दल म्हसवड पोलीस ठाण्याचा गौरव

म्हसवड /सातारा(दि.19जून):- म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 106/25 हा दरोड्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यामध्ये तक्रारदार यांना अज्ञात 6 ते 7 अनोळखी लोकांनी मोटरसायकल वरून येऊन त्यांना लोखंडी रॉड तसेच बंदूक, तलवार व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख 12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दरोडा टाकून घेऊन गेले बाबत तक्रार दाखल झालेली होती.

या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफने आरोपींच्या शोधाकरिता पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबे, दुकाने, घरे अशा ठिकाणी लावलेले 25 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच तांत्रिक विश्लेषण करून तसेच अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेऊन अवघ्या 4 तासात हा दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून या गुन्ह्यातील सर्व 7 दरोडेखोरांना अटक करून त्यांच्याकडून दरोडा टाकून चोरून घेऊन गेलेले 5 लाख 12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करून सातारा जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस स्टाफला बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ म्हणजेच सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.