सीमाराणी बागुल यांना साहित्य साधना पुरस्कार जाहीर

122

✒️नाशिक प्रतिनिधी(जगदीप वनशिव)

नाशिक(दि.25जून):- साहित्यकणा फाउंडेशन व भाव सुमन प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील साहित्यिकांना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. 2025 यावर्षी देण्यात येणाऱ्या साहित्य साधना पुरस्कारासाठी नाशिक येथील रहिवासी उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका व कवयित्री सीमाराणी बागुल यांना साहित्य साधना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पहिला कवितासंग्रह जीवनाची शाळा याचे प्रकाशन कोपरगाव येथे संपन्न झाला नारायण सुर्वे कवी कट्टा येथे गर्भारलेल्या मातीतून या दुसऱ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन कवितासंग्रहाचे प्रकाशन झालेले आहे. 

सीमाराणी बागुल यांच्या साहित्यिक कार्याची दखल गर्भारलेल्या मातीतून या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

नाशिक येथील कॅनडा कॉर्नर येथील समर्थ मंगल कार्यालयात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती व संजय गोरडे यांनी दिली आहे.