शरद पवारांच्या निष्ठावंतांची मिटिंग उत्साहात संपन्न…

622

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)

धरणगाव(दि.1जुलै):-धरणगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मिटिंग जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. 

               सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांचा पक्षाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्याला प्रास्ताविकपर मनोगतातून मिटिंगचा उद्देश स्पष्ट केला. सर्वप्रथम खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. तदनंतर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या शिलेदारांच्या अभिनंदनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात संमत झाला. धरणगाव तालुका व शहरातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

प्रत्येकाच्या बोलण्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आमचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचं नेतृत्व फक्त शरदचंद्रजी पवार. पक्षाच्या स्थापनेपासून आजतागायात इमाने इतबारे पक्षाचे कार्य केले परंतु लाभार्थी म्हणून कोणीही नाही असा सुरु प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होता. नेत्यांनी पक्ष सोडला, कार्यकर्ते मात्र जिथे होते तिथेच आहेत तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही सदैव साहेबांसोबत आहोत अशा भावना प्रत्येकाने व्यक्त केल्या.

तालुक्याच्या ठिकाणी पक्ष कार्यालय असावे, तालुकाध्यक्ष, युवक अध्यक्ष तसेच विविध फ्रंटलच्या अध्यक्षांची लवकरात लवकर नियुक्त्या करण्यात याव्यात अशा सूचना मिटिंगमध्ये मांडण्यात आल्या. याप्रसंगी प्रा एन डी पाटील, संजय पाटील, उज्वल पाटील, कल्पिता पाटील, हितेंद्र पाटील, साईनाथ पाटील, बापू मोरे, ओंकार माळी, नारायण चौधरी, मोहन पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. मीटिंगला सामाजिक न्याय विभागाचे रमेश बाऱ्हे, भाऊराव इंगळे हे देखील उपस्थित होते.

जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन यांनी संघटनेच्या बांधणी संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सर्वांचे ऐतिहासिक मिटिंगप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल अभिनंदन केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा उहापोह तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत कोणती रणनीती वापरावी लागेल याबाबत मार्गदर्शन केले. संघटनेच्या कामाला नव्या जोमाने सुरवात करा, काहीही अडचण आल्यास जिल्हाध्यक्ष आणि पक्ष अर्ध्या रात्री तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी दिले. 

                आजच्या या ऐतिहासिक मीटिंगला लक्षणीय उपस्थिती होती. धरणगाव तालुक्यातून बाळासाहेब पाटील, प्रा एन डी पाटील, संजय पाटील, उज्वल पाटील, कल्पिता पाटील, वाल्मिक पाटील, डी एस पाटील, प्रा आर एन भदाणे, डॉ विलास चव्हाण, डॉ नितीन पाटील, बापू मोरे, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र वाणी, श्रीकृष्ण पाटील, संभाजी पाटील, साईनाथ पाटील, मोहन पाटील, देविदास सोनवणे, एकनाथ पाटील, हितेंद्र पाटील, परेश गुजर, एकनाथ पाटील, विकास पाटील, विनायक पाटील, चंद्रभान बाविस्कर, कोमलसिंग पाटील, धनराज पाटील, पिरचंद पाटील, संभाजी पाटील, राहुल पाटील, महेश बोरसे, समाधान पाटील, सुभाष पाटील, दिनेश भदाणे तसेच धरणगाव शहरातून राजेंद्र धनगर, नंदू धनगर, गोपाल पाटील, अमोल हरपे, अमित शिंदे, भगवान शिंदे, ओंकार माळी, नारायण चौधरी, मोहीत पाटील, सागर महाले, मो जुनेद, सिराज कुरेशी, शेख जहांगीर, नगर मोमीन, राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.