प्रा.डॉ.चंद्रकांत सातपुते यांना ज्येष्ठ कार्यकर्ता कब्बडी पुरस्कार जाहीर

193

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515                      

गंगाखेड(दि.2जुलै):- श्री संत जनाबाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.चंद्रकांत सातपुते यांना ज्येष्ठ कार्यकर्ता कब्बडी पुरस्कार जाहीर झाला आहे.दिनांक 15 जुलै रोजी कबड्डी दिनी अमृत कलश देऊन प्रा.डॉ.चंद्रकात सातपुते यांना सन्मानित करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशियनच्या वतीने कबड्डी दिनानिमित्त दिला जाणारा ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार प्रा.डॉ.सातपुते यांना जाहीर झाल्याने परभणी जिल्हा तसेच श्री संत जनाबाई महाविद्यालय,महारुद्र क्रीडा मंडळ इसाद गावासाठी अभिमानाची बाब आहे

शहरातील श्री संत जनाबाई महाविद्यालयात क्रीडा प्राध्यापक म्हणून सेवा देत असलेले उपप्राचार्य प्रा.डॉ.सातपुते यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड केली आहे दिनांक 15 जुलै रोजी कबड्डी महर्षी स्व.शंकरराव साळवे यांची जयंती कबड्डी दिन म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो.

यावर्षी 25 वा कबड्डी दिन समारंभ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली संपन्न होत असून 15 जुलै रोजी जय मंगल कार्यालय पांडवा देवी तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला असून या कबड्डी सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपप्राचार्य प्रा.डॉ.चंद्रकांत सातपुते यांचा ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार अमृत कलश प्रदान करण्यात येणार आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री संत जनाबाई महाविद्यालय, इसाद ग्रामस्थ व सर्व स्तरातून प्रा.डॉ.सातपुते यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे