गंगाखेड येथील डॉ. गारोळे यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोसर्जन पदवी प्राप्त

115

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.3जुलै):- गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी विषयाचे अभ्यासक्रम व फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेली परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याबद्दल गंगाखेड शहरातील पोट विकार तज्ञ तथा प्रसिद्ध सर्जन डॉ. किशन गारोळे यांना जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोसर्जन या नामांकित संस्थेच्या वतीने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोसर्जन पदवी प्रदान करण्यात आली आहे.

                                           संस्थेतर्फे गेल्या 31 वर्षामध्ये एकूण 12000 सर्जन डॉक्टरांना पदवी बहाल करण्यात आली असून यामध्ये डॉ. गारोळे यांनाही पदवी बहाल करण्यात आली आहे.

या अगोदरही डॉक्टर गारोळे यांनी 2014 साली इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोसर्जन्स फेलोशिप आणि 2016 साली फेलोशिप इन मिनिमल ॲक्सेस सर्जरी या पदव्या प्राप्त केल्या आहेत. गंगाखेड शहरासाठी ही अभिमानाची बाब असून गेली 31 वर्षे जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोसर्जन या नामांकित संस्थेच्या वतीने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोसर्जन पदवी बहाल करण्यात आली आहे.

या यशाबद्दल गंगाखेड शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉ.गारोळे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. शहरातील व परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक, मित्र परिवार आदीसह सर्व स्तरामधून डॉ.गारोळे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.