तालुक्यात 7 नवीन रास्त भाव दुकानांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन- 1 जुलै ते 31 जुलै 2025 दरम्यान विहीत नमुन्यातील अर्ज सादर करता येणार

97

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7जुलै):- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व सिदेंवही या तालुक्यांतील एकूण 7 गावे / क्षेत्रांकरिता नवीन रास्त भाव (स्वस्त धान्य) दुकान परवाने मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर गावांमध्ये रास्त भाव दुकान स्थापनेसाठी पात्र इच्छुक संस्थांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

*अर्ज करण्यास पात्र असलेल्या संस्थांमध्ये पुढील प्रकार समाविष्ट आहेत :* ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था

*अर्ज प्राप्त करण्याचा व सादर करण्याचा कालावधी :* दिनांक 01 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत, शासकीय कामकाजाच्या दिवशी, संबंधित तहसिलदार कार्यालय किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध होतील. तसेच, अर्ज भरून त्या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करता येतील. अर्ज सादर करताना शुल्क रु. 5/- (अक्षरी रुपये पाच फक्त) राहील.

*जाहीरनामा प्रसिद्ध गावांची यादी पुढीलप्रमाणे :* जिवती तालुका : पाटागुडा, चलपतगुडा, मच्छीगुडा, कलगुडी, खडकी रायपूर, सिंगारपठार, सिदेंवही तालुका : कारगाठा

*अर्ज करण्याच्या अटी व शर्ती*, जाहीरनाम्यातील गावांची संपूर्ण माहिती संबंधित तहसिलदार, प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास विभाग) चंद्रपूर, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर, तसेच संबंधित ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिका कार्यालयातील सूचना फलकावर आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.chanda.nic.in उपलब्ध करण्यात आलेली आहे.

सदर परवान्यासाठी पात्र संस्थांनी विहीत मुदतीत व अटींनुसार अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री बहादुरकर करण्यात येत आहे.