

✒️अंबाजोगाई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अंबाजोगाई(दि.11जुलै):- अंबाजोगाई येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गुरु पोर्णिमा निमित्त जेष्ठ नागरिकांचे (७५ वर्षांवरील माता-पिता) सन्मान व स्वागत सोहळा उत्साहात पार पडला.
या वेळी जेष्ठ नागरिकांवर फुलांचा वर्षाव करत, प्रेमपूर्वक त्यांचे स्वागत करण्यात आले. महिलांना साडी व पुरुषांना भगवद्गीता भेट देऊन सन्मान करण्यात आला. ७५ दिव्य दिवे लावून, भगवान दत्तात्रेयांची आरती करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा शिवकन्या रांदड, उपाध्यक्षा उमा बजाज, सचिव पूनम भन्साळी, दीपाली धूत, आरती तोष्णीवाल, रेणुका झवंर, दीपा भंडारी व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. माहेश्वरी महिला मंडळ, अंबाजोगाई यांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व गुरु पोर्णिमाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



