

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.11जुलै):- गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला घडविणाऱ्या गुरुजनांना शाळेतील विद्यार्थ्यांनी योग प्राणायाम सूर्यनमस्कार करून गुरुदक्षिणा अर्पण केली.गुरु पौर्णिमा निमित्त पालम तालुक्यातील रावराजूर येथील श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालय येथे (दिनांक 10 जुलै गुरुवार) रोजी गुरू पौर्णिमा तथा व्यास पोर्णिमा उत्साहात साजरा करण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी साप्ताहिक योग कक्षेचे योग गुरू प्रकाश डिकळे यांचा योग प्राणायाम सूर्यनमस्कार करून सत्कार केला.
यावेळी योग शिक्षक प्रकाश डिकळे यांनी उपस्थित योग साधकांना गुरुपौर्णिमेचे महत्व विशद केले गुरू शिष्य परंपरा सांगितली.व योग प्राणायाम सूर्यनमस्कार घेतले. सदरील कार्यक्रमात गुरुवर्य महंत श्री नरेंद्र गिरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षक काळे ,चलवाड यांच्यासह उपस्थित शिक्षकांनी केले त्यानंतर गुरू वंदना शंखनाद व आनंदाची आरती प्रकाश डिकळे यांनी घेतली गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार 9 वी.तील विद्यार्थ्यांनी केला यावेळी श्रावणी शिंदे,अश्विनी शिंदे,प्राची शिंदे,अक्षरा शिंदे यांनी गुरुबद्दलचे भाव मनोगतात व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन 9 वी.च्या विद्यार्थ्यांनी केले होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रकाश डिकळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.



