धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात आश्रमशाळा मरसुळच्या गुणवंताचा सत्कार

160

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13जुलै):-आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा व पुसदद्वारा आयोजित प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे बळीराजा चेतना सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे दि. १२/०७/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. 

त्यानिमित्य इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष गुणासह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा राघोजी भांगरे गुणगौरव योजने अंतर्गत सत्कार करुन गौरविण्यात आले.

महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्था, पुसद द्वारा संचालित महात्मा मुंगसाजी आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, मरसुळ ता. पुसद जि. यवतमाळ येथील प्राविण्य प्राप्त १० वी ची विद्यार्थीनी कु. निकीता श्रीराम घुक्से (९२.८०%) उच्च माध्यमिक शाळेतील विज्ञान शाखेचा सुमित प्रकाश दुमारे (८१.५०%), अनिकेत खंडेराव डाखोरे (७९.५०%), अदिनाथ गणेश मैघणे (७९.३३%), कु. प्रगती श्रीराम घुक्से (७९.००%) कु. योगिता आनंदराव डाखोरे (७७.००%) व कला शाखेची कु. चंचल प्रेम भिसे (७१.८३%) व राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत सुयश संपादन केले.

या पुसद प्रकल्पातील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा.ना.प्रा.डॉ. अशोक उईके मंत्री आदिवासी विकास म.राज्य तसेच संजय राठोड, मंत्री मृद व जलसंधारण म.रा. तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा, विकास मिना (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी यवतमाळ व व्यासपिठावरील मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला.

आश्रम शाळा शैक्षणिक व क्रिडा स्पर्धेत भरिव प्रगती करीत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसदचे प्रकल्प अधिकारी, अमोल मेतकर, संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र मोघे, आश्रम शाळेचे युवा संचालक लिलाधर मळघणे, शाळेचे प्राचार्य ए.जी. सय्यद व सर्व कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.