

▪️मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सर्पमित्रांचा पुढाकार
✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.13जुलै):-राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीने केले नागीन आणि तिच्या तेरा पिलांसह बारा अंडे निसर्गमुक्त.
पावसाळा आला की अनेक पशू पक्षी,जीव, कीटक, सरपटणारे प्राणी यांचा वावर वाढलेला दिसतो. प्रत्येक सजीव आपल्या जीवाची रक्षा करण्यासाठीं मिळेल त्या सुरक्षित ठिकाणी आपले अधिवास शोधून राहतो. पुनरुत्पादन अर्थात आपल्या सारखा दुसरा जीव निर्माण करण्याची नैसर्गिक प्रक्रिया सजीवांत आढळून येते. गडचांदुर येथील सुभाष रामचंद्र क्षीरसागर यांच्या राहत्या घरी चक्क नाग प्रजातीच्या विषारी सर्पाने अंडी दिली व त्यातील तेरा पिल्ल अंड्यातून बाहेर पडली तर बारा अंड्यातून पिल्ले बाहेर पडायचे होते.
आपल्या घरात साप असून तो विषारी प्रजाती व पिल्ल दिलेला असल्यानं लगेच क्षीरसागर यांनी राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती गडचांदुर चे सर्पमित्र अजय गिरटकर , कोरपना तालुका अध्यक्ष व दिपेश वनकर, कोरपना तालुका उपाध्यक्ष यांना बचाव कार्यासाठी बोलावले. मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी लगेच दोघांनीही घटनस्थळाला भेट दिली. आणि नागिण व तीच्या पिलांसह अंड्यांना गडचांदुरच्या जंगलात निसर्ग मुक्त केले. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पाच उप समित्या असून त्यातील पर्यावरण संवर्धन समिती सोबतच कला,साहित्य व सांस्कृतिक विकास समिती, राष्ट्रीय महिला हिंसाचार प्रतिबंधक समिती, गड किल्ले संवर्धन समिती, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दिपक भवर, महासचिव आशिया रीजवी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, सचिव बापू परब, महीला अध्यक्षा डॉ. प्रिती तोटावार,उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे आदींसह पदाधिकारी यांनी सर्पमित्रांच्या कामगिरी बद्दल अभिनंदन व कौतुक केले.



