संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी एक जण चक्क पॅरोल वरती आहे बाहेर!

277

✒️नागेश खुपसे-पाटील(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.15जुलै):-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाई फेक आणि हल्ला झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात रवींद्र उर्फ लल्या लेंगरे, अक्षय चव्हाण, अनिल माने या तिघांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी रवींद्र उर्फ लल्या लेंगरे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल असून तो पॅरोलवर तुरुंगाबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामधील एकूण आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे. यापैकी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आठ आरोपी फरार असून, सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

अक्कलकोटच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात आरोपींना हजर केले असता, सरकारी पक्षाने युक्तिवाद केला की, “संभाजी ब्रिगेडचं नाव जे आहे संभाजी ब्रिगेड असं असल्यानं छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो असा दावा जो आंदोलकांनी केलेला होता। मात्र या संघटनेचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेड असल्यानं यामध्ये आताच हा प्रकरण अशा पद्धतीनं आंदोलन का करण्यात आलं असा युक्तिवाद करण्यात आला। त्यामुळे मोटीव जे आहे इंटेन्शन जे आहेत ते आंदोलकांचे वेगळे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो सरकारी पक्षाने केलेला होता.” पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती.