

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378
नागभीड(दि.16जुलै):- तालुक्यातील मौजा कोटगाव येथील महिला वैशाली श्रावण मोहरकर (45 वर्ष ) यांनी आज (16 जुलै सकाळी पाच वाजता कोटगाव येथील नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केली. सदर महिलेचे प्रेत बोथली येथील नाल्यात काही नागरिकांना तरंगताना आढळून आले. या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी प्रेताचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृतक वैशालीचे पती
श्रावण मोहरकर हे कोटगाव येथील कृषक वसतिगृहात गेल्या पंचवीस वर्षापासून अल्प वेतनावर अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. मात्र सामाजिक न्याय विभागाकडून मार्च महिन्यापासून पगार न झाल्याने मृतक वैशाली आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक विवंचनेने ग्रस्त असलेल्या वैशालीने टोकाचे पाऊल उचलत आज सकाळी गावातीलच नाल्यात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. वैशालीच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या पश्चात दोन मुले व पती असा कुटुंब आहे.



