

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा (१८ जुलै)सास्ती केंद्राच्या पहिल्या शिक्षण परिषदेचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सास्ती मराठी येथे पार पडली. या परिषदेचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सावनकुमार चालखुरे यांच्या हस्ते करण्यात आले. बदलत्या शिक्षण प्रणालीनुसार प्रत्येक शिक्षकाने स्वतःला अद्यावत करणे गरजेचे आहे. गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमाचा वापर करावा हे आव्हान सावनकुमार चालखुरे (शिक्षण विस्तार अधिकारी, बीट कढोली) यांनी उपस्थित शिक्षकांना केले. शिक्षण परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख प्रभाकर जुनघरे, केंद्र मुख्याध्यापक हंसराज शेंडे, बीट मुख्याध्यापक चानकुमार खोब्रागडे, विषय साधन व्यक्ती मुसा शेख व गीता जांभूलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण परिषदेमध्ये मराठी विषयासाठी करूणा गावंडे , सास्ती,गणित विषयासाठी अमोल बदने व इंग्रजी विषयासाठी सुनीता टिपले यांनी आदर्श पाठ घेऊन अध्यापनाला दिशा दिली.
तसेच शैक्षणिक साहित्य रचना व वापर यावर राजेश्वर जयपुरकर , अश्विनी पाटील व छाया गोंडे यांनी चर्चात्मक मार्गदर्शन केले व साहित्याची सर्वांना ओळख करून दिली .निपुण अँप व प्रश्नपेढी यावर तांत्रिक मार्गदर्शन हंसराज शेंडे सर यांनी केले.शिक्षण परिषदेत केंद्रातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय अडचणी आणि त्यांच्या उपायोजना यावर केंद्रप्रमुख प्रभाकर जुनघरे यांनी चर्चा घडवून आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा गावंडे-जांभूळकर यांनी केले तर सर्वांचे आभार मुख्याध्यापक हंसराज शेंडे सर यांनी व्यक्त केले.



