ब्रम्हपूरी तालुक्यातील वृक्षलागवड घोटाळ्याची चौकशी करा- जि. प. सदस्य डॉ.राजेश कांबळे, मोरेश्वर ऊईके यांनी केली मागणी

213

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.21जुलै):- तालुक्यात सामुहिक वनहक्क समिती द्वारे वृक्ष लागवड मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासंदर्भात गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान यांना माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.

 ब्रम्हपूरी तालुक्यातील चोरटी,वायगाव, चांदगाव, बोदरा, धामनगाव व इतर २७ गावांमध्ये सामुहिक वनहक्क समिती द्वारे MRGS अंतर्गत शेवगा वृक्ष लागवड कागदावर शासनदरबारी दाखविण्यात आली. तालुक्यातील या २७ गावांमध्ये वृक्ष लागवड व वृक्ष खरेदी, किटकनाशके खरेदी, खत खरेदी, झाडाला पाणी देण्याचा पाजरा बोर्ड, न केलेल्या कामाची मजूरी देण्यात आली. सदर कामाचे सामाजिक अंकेक्षण (सोशल आॅडीट) झाल्यानंतर वृक्ष लागवड न करता शासनाच्या कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे जनतेच्या लक्षात आले. परंतु सदर प्रकरणाची शासनदरबारी तक्रार, मोर्चे आंदोलने करून देखील कुठलीही चौकशी प्रशासनाद्वारे करण्यात आली नाही.

शासन परिपत्रक नुसार सामुहिक वनहक्क समिती मध्ये ६० टक्के लोक हे अनुसूचित जमातीचे असावे व समीतीचा अध्यक्ष हा अनुसूचित जमातीचा असावा असा शासन परिपत्रक असुन देखील या परिपत्रकाची पायमल्ली ब्रम्हपूरी तालुक्यात करण्यात आलेली आहे.

करीता सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, तालुका कन्वर्जन समीतीचे सदस्य मोरेश्वर ऊईके, आदीवासी टायगर सेना जिल्हा उपाध्यक्ष वैभव कुसनाके यांनी केली आहे.