रुग्णालयाच्या दिरंगाईमुळे मुस्तकीन शेख यांचा मृत्यू-कुटुंबियांचा पत्रकार परिषदेत आरोप

80

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-91689 86378

नागभीड(दि.21जुलै)’-रेफर केलेल्या रुग्णाला ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेत बिघाड निर्माण झाल्याने रुग्णवाहीका मध्यरात्री वाटेतच भर जंगलात बंद पडली. ख्रिस्तानंद रुग्णालयाने दुसरी रुग्णावाहीका पाठविण्यास अतिशय दिरंगाई केल्याने रुग्णास व त्यांचे नातेवाईकांस अनेक तास ताटकळत राहावे लागले.यामुळे रुग्णास वर्धा येथील रुग्णालयात पोहचेपर्यंत तब्येत खालावून रुग्ण कोमात गेला. रुग्णाची प्रकृती अतिशय खालावल्याने वर्धा येथील रुग्णालयाचे डॉक्टरांनी रुग्णास घरी नेण्यास सांगितले. अखेर घरी रुग्णाचे निधन झाले. ख्रिस्तानंद रुग्णालयाच्या डॉक्टरांचा बेजबाबदारपना रुग्णास भोवल्याने सदर रुग्णालयाच्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. रुग्णाच्या कुटुंबियांनी केली नागभीड येथे पत्रकार परिषदेत केली.

नागभीड येथील रहिवासी मुस्तकीन शेख वय अंदाजे 29 वर्षे याची प्रकृती दिनांक 29जून रोजी रोजी सायंकाळी सहा वाजता अचानक बिघडली. त्यांना फिट्स व झटके असल्याने तातडीने ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून रुग्णाला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. कुटुंबीयांनी तात्काळ ख्रिस्तनणंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे रुग्णाला ऍडमिट केले. रुग्ण गंभीर असल्याचे डॉक्टरानी सांगत व्हेंटिलेटर ची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी 10000 बेड चार्ज,१७०० ची औषधी आणि पुढे आणखीही शुल्क आकारण्यात आले.एकूण 35 हजार 400 रुग्णांच्या उपचारासाठी खर्च झाले . या संपूर्ण प्रक्रिया दरम्यान डॉक्टरांकडून उपचारात विलंब झाला असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत नातेवाईकांनी केला आहे. त्यातच अगोदर रक्कम जमा करण्याचा तगादा लावल्याने रुग्णाला उपचारासाठी विलंब लागला. त्यानंतर तेथून दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये रुग्णास हलविण्यास सांगण्यात आले.

रुग्णास व्हेंटिलेटर सह दुसऱ्या रुग्णात हलवण्यासाठी 17000 रुपये गाडीचा खर्च म्हणून घेतले. परंतु या रुग्णवाहिका रात्र साडेअकरा वाजता भिशी- गिरड मार्गावर नांदगाव गावाजवळ जंगलात अचानक काम करणे बंद केले रुग्ण अति गंभीर अवस्थेत असताना सुमारे दोन ते चार वाजेपर्यंत दुसऱ्या रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करण्यात आली.त्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि परिणामी रुग्णाच्या शरीरात डाव्या बाजूला पक्षघात झाला. चार वाजता पहाटे दत्ता मेघे हॉस्पिटल वर्धा येथे रुग्ण दाखल झाला. प्रकृती अधिकच खालावल्यामुळे 2 जुलै 2025 रोजी रुग्णास नागपूरच्या एम्स रुग्णालय हलवण्यात आले. परंतु तिथे उपचार दरम्यान रुग्ण कोमामध्ये गेला. 12 जुलै 2025 ला नागपुर येथून रुग्णाला घरी आणण्यात आले.आणि 14 जुलै रोजी 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जेव्हा हॉस्पिटल ने रुग्णवाहिकेसाठी 17000 घेतले आणि रुग्णाला सुरक्षितपणे पोहोचवण्याची हमी दिली किंवा रस्त्यात वाहन बिघडल्यास जबाबदारी कुणाची? रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती तर रुग्णाचा जीव वाचला असता का? हॉस्पिटलमध्ये घेतले गेलेले अतिरिक्त पैसे विलंब आणि गैरवस्थापन हे रुग्णाच्या मरणाला कारणीभूत नाही का? रुग्णाच्या कुटुंबियांनी ख्रिस्तानंद हॉस्पिटल आणि संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्याच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधावर कडक कारवाई व्हावी. अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.या पत्रकार परिषदेला शाहरुख सकि शेख, रियाज रफिक शेख, तन्वीर साकि शेख, अरशील मुस्तकीन शेख, असल मुस्तकीन शेख उपस्थित होते.