साकोली शहराचा “सत्यानाशी” लोकांनी सत्यानाश केला – आमदार नाना पटोले 

367

▪️अमराई प्रभागात आमदार नाना पटोले यांचा जनता दरबार ; महिला जनता झाल्या होत्या संतप्त 

✒️किशोर बावणे(भंडारा,विशेष प्रतिनिधी)मो:- 7350793187

साकोली(दि.21जुलै):-“नगरपरिषद शहरी क्षेत्रात ही अमराई वस्ती येते, पण त्या स्तरावर एखाद्या ग्रामीण गावापेक्षाही खराब स्थिती करून ठेवली आहे ती येथील नगरपरिषदेच्या सत्यानाशी लोकांनी, आज एक खेडेगावात तरी सुसज्ज रोड असतात. पण गेल्या पंचवार्षिक काळातही काहीच करू शकले नाही, तर यांनी जनतेसाठी आलेल्या निधीचे केले काय.?” असे प्रतिपादन आमदार नाना पटोले यांनी ( रविवार २० जुलै ) ला अमराई वस्तीत जाऊन आयोजित तेथील जनता दरबारात रोखठोकपणे प्रतिपादन केले. येथे अमराई वस्तीतील जनतेने बॅंगलोर लॉन येथे जनता दरबार आयोजित केला. यावेळी महिला पुरुष जनताही मागील नगरसेवकांवर चांगलेच संतापलेल्या भूमिकेतून बोलले. 

             साकोली शहरातील प्रभाग क्र. ८ व आताचा १० मधील जनतेने नुकतेच नगरपरिषदेला येथे रोड नाही, नाली नाही, बालोद्यान नाही, याची तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा येणाऱ्या मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता. यांचे पत्र आमदार नाना पटोले यांकडे पोचले. त्यातच जनतेने रविवार ता. २० ला यावरून थेट जनता दरबार आयोजित केला.

यामध्ये मंचावर आमदार नाना पटोले, दिलीप मासूरकर, व्हीआयपी ग्रुपचे अध्यक्ष अनिल कापगते, फ्रिडमचे किशोर बावणे, सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे, महिला जनप्रतिनिधी सुरैय्या वाघमारे, सुधाकर संग्रामे, मोरेश्वर तिडके आदी हजर होते. या दरम्यान बोलताना आ. पटोले यांनी सांगितले की, अखेर नगरपरिषदेच्या लोकांनी येथे केले काय. नगरपरिषदेची जेव्हा यंत्रणा येथे बसली होती तेव्हा पासून येथे काय झाले ते येथे न सांगितलेलेच बरे.

म्हणजेच एवढी दयनीय अवस्था हे सत्यानाशी लोक करतील याचा अंदाजही येथील भोळ्या भाबड्या जनतेने लावला नव्हता. ही मतदार जनतेची दिशाभूल केली आहे. यावेळी उपस्थित महिला पुरुष जनता विविध प्रलंबित समस्यांना घेऊन भाषणाचा मधातच संतप्त झाले होते. या जनता दरबारात सुमारे पाचशेच्या वर महिला पुरुष उपस्थित झाले होते. याप्रसंगी संचालन किशोर बावणे यांनी केले.