प्रहार जनशक्ती पक्षातर्फे 24 जुलै रोजी शेगाव बु. येथे चक्काजाम आंदोलन 

77

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21जुलै):- शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेतमजूर, मच्छीमार व कामगार यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी माजी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे 24 जुलैला चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, सातबारा कोरा आदेशाची अंमलबजावणी व इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.

                  शेगाव बु.- चिमूर महामार्ग येथे 24 जुलै गुरुवार रोजी सकाळी 10 ते 12 या कालावधीत राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या चक्काजाम आंदोलनाला शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग,शेतमजूर,मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांनी हजारोच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांनी केले आहे.