कारच्या धडकेत पिपंरी येथे म्हसवडचा युवक जागीच ठार

104

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातार)(दि.21जुलै पिंपरी ता.माण जि.सातारा गावचे हद्दीत पिंपरी बस स्टॉप जवळ म्हसवड ते सातारा जाणारे रोडवर 20/07/2025 रोजी दुपारी 3:45 वा.चे सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन म्हसवड येथील युवक जागीच ठार यांची म्हसवड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करणेत आली आहे.

पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि फिर्यादिनुसार दिनांक 20/07/2025 रोजी दुपारी 3:45 वा.चे सुमारास मौजे पिंपरी ता.माण जि.सातारा गावचे हद्दीत पिंपरी बस स्टॉप जवळ म्हसवड ते सातारा जाणारे रोडवर यातील विजयानंद हणुमंत गुरव वय 47 वर्षे मुळ रा.निगडी-पवारांची देगाव ता.जि.सातारा सध्या रा. आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे याने त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपणीची XUV300 कार क्र MH14LE1144 हीने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन, भरधाव वेगात चालवुन, राँग साईटला येवुन म्हसवड बाजुकडे जाणारे महादेव मानसिंग भालेराव याचे स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्र MH11CS7567 हीस जोराची धडक देवुन अपघात केला.

त्यामध्ये मोटार सायकल चालक माझे मेव्हुणे महादेव मानसिंग भालेराव वय 28 वर्षे रा.म्हसवड ता.माण जि.सातारा यांचे डोक्यास , तोंडाला, हाताला, छातीला गंभीर जखमी करुन त्यांचे मृत्युस कारणीभुत होवुन तसेच दोन्ही वाहनांचे नुकसाणीस कारणीभुत झाला आहे म्हणुन माझी विजयानंद हणुमंत गुरव वय 47 वर्षे मुळ रा.निगडी-पवारांची देगाव ता.जि.सातारा सध्या रा. आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे याचे विरुध्द तक्रार आहे. या घटनेचा पुढील तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करत आहेत.