

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.22जुलै):-अखिल भारतीय ग्राहक पंचायतची बैठक (दिनांक 20 जुलै रविवार) रोजी गंगाखेड शहरातील गीता मंडळ येथे पार पडली.सदरील बैठकीस मराठवाडा प्रांताध्यक्ष डॉ.विलास मोरे,जिलाध्यक्ष गुलाबराव शिंदे, प्रांत पर्यावरण आयाम प्रमुख प्रा.संगीता अवचार,प्रांत विधी विभाग प्रमुख ॲड.संजय केकाण, प्रांत रोजगार आयाम प्रमुख श्रीमती किरण बोचरे,जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव टोले,भानुदास शिंदे, माजी तालुका अध्यक्ष गोपाळ मंत्री ,कोषाध्यक्ष मधुकर मुळे,पालम तालुकाध्यक्ष मोतीराम शिंदे,शहराध्यक्ष धोंडीराम कळंबे,
सेलूचे गंगाधर कान्हेकर,जिंतूरचे मंचक देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड तालुका व शहर शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारणी मध्ये गंगाखेड तालुकाध्यक्षपदी नवनियुक्त अभिजित पूरनाळे यांची निवड करण्यात आली.तर सचिवपदी सय्यद ताजुद्दीन,कोषाध्यक्षपदी महेमूद शेख यांची फेरनिवड करण्यात आली.तालुका सहसचिवपदी ब्रिजेश गोरे,प्रचार व प्रसिद्धी प्रमुख डॉ.सचिन जोशी,पर्यावरण आयाम प्रमुख ॲड.राजू देशमुख,आय.टी. सेलप्रमुख राहुल साबणे,ग्राहक सेवा केंद्र प्रमुख रोहित कोकड,महिला प्रमुख अभिलाषा मंत्री,महिला सहप्रमुख सूर्यमाला मोतीपवळे, गंगाखेड शहर अध्यक्षपदी मकरंद चिनके,उपाध्यक्ष प्रभाकर कळपे,सचिव अक्षय जैन,सहसचिव ज्ञानेश्वर वायकर,कोषाध्यक्ष उमेश पापडू,ग्राहक सेवा केंद्र प्रमुख पंकज दायमा,प्रचार व प्रसिद्धी प्रमुख माधव चव्हाण,पर्यावरण आयाम प्रमुख शिवाजी चव्हाण,आय.टी. सेलप्रमुख सागर गोरे,महिला प्रमुख अनिता वानखेडे,महिला सह प्रमुख माधुरी राजेंद्र,सदस्य प्रशांत जोशी यांची निवड करण्यात आली
महिला अध्यक्षपदी श्रीमती प्रतिमा वाघमारे,उपाध्यक्ष मंजुषा जामगे, सचिव रोहिणी शिंदे,सहसचिव आशाताई रेघाटे,कोषाध्यक्ष अलका तमखाने,प्रचार व प्रसिद्धीप्रमुख पदमजा कुलकर्णी,पर्यावरण आयाम प्रमुख ॲड.स्मिता देशमुख,आयटी सेल प्रमुख लक्ष्मी आडे,महिला व रोजगार आयाम प्रमुख ममता पैठणकर, कार्यकारिणी सदस्य सुजाता पेकम,सिमा मुरकुटे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.तद्नंतर शहरात ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
ग्राहकांनी आपल्या समस्या निवारणासाठी गंगाखेड कार्यकारणीशी संपर्क साधावे असे आवाहन प्रांताध्यक्ष डॉ.मोरे यांनी केले.कार्यक्रमास तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ मंत्री यांनी केले तर आभार राहुल साबणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड.उत्तम काळे आदीसह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.



