जकारिया शुगरने केले यशाचे आणखी एक शिखर सर ..!

200

✒️नागेश खुपसे-पाटील(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.22जुलै):- उन्हात तळणाऱ्या आणि मातीत मळणाऱ्या शेतकऱ्यांच्या घामाचे मोल अनमोल असते हे जाणून बळीराजाचा हक्काचा साखर कारखाना म्हणून नावारूपाला आलेल्या मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगरने आता सीबीजी प्रकल्पात आणखी एक यशाचे शिखर सर केले आहे.एका दिवसात ” रेकॉर्ड ब्रेक” सतरा हजार पाचशे किलो गॅस निर्मिती करून प्रतिदिन देशातील सर्वाधिक गॅस निर्मिती करणारा प्रकल्प म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.

तंत्रज्ञानातील नाविन्याचा ध्यास घेत जकराया शुगरने केवळ उसाचे गाळप करून साखर उत्पादित करण्यापेक्षा विविध उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य दिले आहे. जकराया शुगरचे संस्थापक अध्यक्ष ऍड.बी.बी.जाधवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सचिन जाधव यांचे लहान बंधू तथा पूर्णवेळ संचालक राहुल जाधव आणि मी, या व्यवसायातील कोणताही अनुभव पाठीशी नसताना आणि कोणत्याही तज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाशिवाय सर्व कामगारांनी केवळ समर्पित भावनेने काम केल्याने विविध उपपदार्थ निर्मितीत यशाचे नवनवे मापदंड तयार केले आहेत. जकराया शुगरचा सीबीजी प्रकल्प हे त्या यशाच्या मापदंडाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

१५ फेब्रुवारी २०२४ ला या प्रकल्पाची सुरुवात झाली. आता देशातील साखर कारखानंदारासमोर पथदर्शी ठरत असलेल्या या प्रकल्पातील सुरूवातील आलेल्या तांत्रिक अडचणीने माझ्या संयमाची परीक्षा घेतली.मात्र ” सबर का फल मीठा होता है ” हे ओळखून मी पूर्णवेळ या प्रकल्पावर “फोकस” ठेवला. अखेर सर्व कामगारांच्या प्रयत्नाला यशाची भरजरी किनार लाभली.

वीस हजार किलो प्रतिदिन क्षमता असलेल्या या प्रकल्पातून सतरा हजार पाचशे किलो गॅस एका दिवसात उत्पादन करण्यात आले.शुद्धता आणि उच्च गुणवत्ता या जोरावर लवकरच वीस हजार किलोचाही टप्पा ओलांडू ही आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या पाठबळाच्या जोरावर खात्री देतो.असे सचिन जाधव यांनी यावेळी म्हटले.