महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी यांचा अंबाजोगाई दौरा संपन्न

91

✒️अंबाजोगाई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अंबाजोगाई(दि.26जुलै):- महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी अंबाजोगाई येथे दि.२५ जुलै रोजी भेट देवून माहेश्वरी समाजातील लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ढालेगाव येथे महिलांसाठी होणा-या नवचेतना शिबीरात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान केले.

येथील राजस्थानी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महेश वंदनाने झाली. यावेळी संवाद साधताना मधुसूदन गांधी यांनी युवकांसाठी डिसेंबर मध्ये एमटीएफ हे व्यापारी प्रदर्शन छत्रपती संभाजी नगर मध्ये आहे, त्यात येऊन आपला व्यापार वाढवावा असे सांगितले.

तसेच येत्या ऑगस्ट महिन्यात समाजातील महिलांसाठी होणा-या नवचेतना शिबीरात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, समाजातील प्रत्येक घटकांनी जोधपुर आंतरराष्ट्रीय महाकुंभला उपस्थित राहावे असे आव्हान केले. या दौ-यात त्यांच्यासोबत मंत्री सत्यनारायणजी सारड़ा, अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे संयुक्त मंत्री श्री. जुगलकिशोरजी लोहिया, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे संयुक्त मंत्री श्री नंदकिशोर तोतला, प्रदेश जनसंपर्क मंत्री ओमप्रकाशजी तापडिया हे पदाधिकारी सुद्धा आले होते.

या कार्यक्रमास बीड जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकृष्ण तोष्णीवाल, जिल्हा सचिव जगदीश जाजू, युवा जिल्हाध्यक्ष रोहन मुंदडा, महिला अध्यक्ष शिवकन्या रांदड, पुनम जाजू, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोरजी मुंदडा, युवा अध्यक्ष किरण भन्साळी, प्रीतम तापडिया, पुनम भन्साळी, ललित बजाज, संतोष भंडारी, कांतीलाल चोकडा, विजय नावंदर, गुलाब सारडा, रामानुज मुंदडा, दत्तप्रसाद लोहिया यांच्यासह माहेश्वरी समाजातील युवक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश तोष्णीवाल तर संचलन अमित रांदड यांनी केले. उपस्थितांचे आभार विजय नावंदर यांनी मानले.