

▪️राजुरा न.प.केंद्राची पहीली शिक्षण परिषद संपन्न
✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428)
राजुरा(दि.२६जुलै):- नगर परिषद राजुरा केंद्राच्या पहिल्या शिक्षण परिषदेचे आयोजन आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे पार पडले. या परिषदेला अध्यक्ष म्हणून बंडू ताजने, केंद्र प्रमुख, नगर परिषद राजुरा यांची उपस्थिती होती. प्रमूख अतिथी म्हणून छाया मोहितकर, मुख्याध्यापिका गोपिकाबाई सांगडा पाटील आश्रम शाळा राजुरा, गजानन खामनकर , मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कूल राजुरा, सी.आर.जी. म्हणून सचिन वडेट्टीवार, बंडू बोढे, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे , आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शिक्षण परिषदेमध्ये निवेदिता पातुरकर, इंदिरा गांधी न.प.प्राथमिक शाळा यांनी शैक्षणिक साहित्याची ओळख व त्याचा योग्य वापर हा आदर्श पाठ घेतला. शासनामार्फत मिळालेल्या जादुई पेटारा या शैक्षणिक साहित्य पेटीतील बऱ्याच साहित्यांचा योग्य वापर यावेळी त्यांनी आपल्या आदर्श पाठातून व्यक्त केला. मराठी विषयाचा आदर्श पाठ प्राजक्ता साळवे, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथील शिक्षीका यांनी प्रत्यक्ष विद्यार्थांना समोर बसवून घेतला.
नगर परिषद केंद्रातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा तसेच विद्यार्थी केंद्रित शिक्षणातून मानवी जीवनमूल्य जोपासल्या जावे असे प्रतिपादन बंडू ताजने यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी कांबळे यांनी केले तर प्रास्तावीक नलिनी पिंगे यांनी केले. आभार ज्योती कल्लुरवार यांनी मानले.



