

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते माण तालुक्यातील म्हसवड येथे उभारण्यात आलेल्या आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
या लोकार्पण कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे, मा.जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), सातारा जिल्हा परिषद मा.कृषी व पशुसंवर्धन सभापती शिवाजीराव शिंदे, मा.सभापती विलासराव देशमुख,माण तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड, युवामोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट,नितीन भाई दोशी, डॉ.वसंत मासाळ, शंकरशेठ वीरकर, अल्पसंख्यांक आघाडी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष अकील काझी, लाडकी बहीण योजनेचे विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, डॉ.प्रमोद गावडे,नानासाहेब दोलताडे, राजूआप्पा पोळ,युवानेते लुनेश विरकर, बाळासाहेब पिसे, करणभैय्या पोरे,म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड,वैद्यकीय अधिकारी योगेश कुलकर्णी, यांच्यासह आदी मान्यवर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
अलीकडच्या काळात आरोग्य सुविधांचा विकास वेगाने होत आहे.स्वातंत्र्योत्तर अमृतकाळात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सन २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी. देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन जयकुमार गोरे यांनी केले.
आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक सुरक्षा कवच देण्यात आले आहे. म्हसवड येथे नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही नागरिकांची आग्रही मागणी होती.आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर नव्या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले असून या माध्यमातून या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. म्हसवड येथील आरोग्यव्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार आहे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम, दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचे मत ग्रामविकास मंत्री ना.श्री. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर केंद्राच्या इमारतीमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळेल.नूतन इमारतीमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकारच्या आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर केंद्रात गरजू व्यक्तीवर मोफत उपचार होणार आहेत.



