

चिमूर..
चिमूर येथील आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिमूर र. न. ८१६च्या स्थापनेला चार वर्ष यशस्वी पणे पूर्ण होऊन दिनांक २७ जुलै ला विविध उपक्रम द्वारे वर्धापन दिन साजरा करण्यात आला. समाजातील सर्वसामान्य वर्गाला नावा प्रमाणे आधार देणारी पतसंस्था असून भविष्यात ही पत संस्था उंच भरारी घेईल असे मत प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते अरविंद सांदेकर यांनी वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.
वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सरोज चौधरी यांनी संस्थे प्रति विश्वास दाखवून अल्पावधीतच संस्थेचा टर्नओव्हर दहा करोडच्या वर नेणाऱ्या सभासदांचे हित जोपासण्याचे वचन दिले.., प्रमुख अतिथी अरविंद सांदेकर, स्टेट बँक ऑफ इंडिया चिमूर चे शाखा प्रबंधक धम्मपाल नरवाडे, गुणवंत वाघमारे, सौं रुपाली नन्नावरे, संदीप धारणे, डॉ. दिपक दडमल, सरपंच प्रशांत कोल्हे वहानगाव उपस्थित होते.
यावेळेस धम्मपाल नरवडे यांनी ग्राहकाशी नातेवाईका प्रमाणे व्यवहार केल्यास ग्राहकांना आत्मविश्वास वाढल्याने नक्कीच यश प्राप्त होतो. असे प्रतिपादन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
तसेच केशव गजभे, प्रकाश जांभूळे, राकेश जिवतोडे, ओमेश जांभूळे, संकेत सूर्यवंशी, सुरेश खडसंग, विनोद शेरकुरे, आशिष जिवतोडे, आकाश चौधरी सुशील नन्नावरे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी पतसंस्थे च्या यशस्वी कार्यात अभिकर्ता यांनी मोलाची भूमिका बजावली आणि प्रत्येक अभिकर्ता यांना बँक तर्फे बॅग भेट देण्यात आली. तसेच क्रियाशील उत्तम ठेवी व वेळेवर नियमित पणे कर्ज परतफेड करणाऱ्या जगदीश झोडे, अंकित पिसे, पियुष जांभूळे, रवींद्र बारेकर आदी सभासदांचा गुण गौरव करीत सत्कार करण्यात आला.
पतसंस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण सप्ताह राबवून सुमारे १०० वृक्ष लावून वडाळा स्मशानभूमी, मुख्य रस्त्याच्या कडेला, सामाजिक भवन व मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.
वर्धापन दिनाचे कार्यक्रम प्रसंगी संचालन ओमेश जांभूळे, प्रास्ताविक गुणवंत वाघमारे तर आभार प्रकाश जांभुळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक सुशांत नन्नावरे, वसुली अधिकारी शत्रुघ्न गुरनुले, लिपिक कुंदा सरपाते यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी पत संस्थेचे सभासद उपस्थित होते.



