रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्यात अज्ञात व्यक्तीने लावले झाड संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागासाठी लाजिरवाणा प्रकार

104

 

रोशन मदनकर (उप संपादक) मो:- 8888628986
भंडारा:-
भंडारा- तुमसर मार्गावर मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या वाहणांची रहादारी सुरु असते. परंतु या मार्गाची अतिशय गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. खड्यात रस्ता की रस्त्यात खडा हे समजायला येत नाही. ही गंभीरता बघता रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्यात अज्ञात व्यक्तीने एक झाड लावला आहे.
भंडारा- तुमसर मार्गानी लहान मोठे असे अनेक वाहन धावत असतात. शाळकरी विध्यार्थी, नागरिक या मार्गानी ये- जा करतात. परंतु भंडारा- तुमसर मार्ग खड्डेमय झाला असल्याने मोठी दुर्घटना होण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे एक अज्ञात सज्जन व्यक्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून दाभा गावाच्या जवळील भंडारा- तुमसर मार्गवर पडलेल्या मोठ्या खड्यात झाड लावले. मुख्य मार्गाच्या रस्त्याच्या मध्ये झाड लावणे म्हणजे संबंधित सार्वजनिक विभागासाठी लाजिरवाना प्रकार दिसून येत आहे. बातमी लिहीपर्यंत अज्ञात व्यक्तीची माहिती प्राप्त झाली नाही.