टाकळी येथील ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार गावातील कामा कडे ग्रामपंचायत कडून दुर्लक्ष

243

 

रोशन मदनकर (उप संपादक) मो:- 8888628986

भंडारा:-
भंडारा तालुक्यातील खमाटा टाकळी येथील ग्रामपंचायत अंतर्गत आरो प्लांट बंद असल्यामुळे दुरूस्ती करीत नसल्याने नागरीकांना पिण्याचा पाणी मिळत नाही. गावातील नाली उपसा केला कचरा उचललेला नाही त्यामुळे गावात दुर्गंधी पसरली असताना ग्रामपंचायत कडून लक्ष दिले जात नाही . सोलर पंप सहा महीण्यापासून बंद असताना दुरुस्ती करण्यात आली नाही.शाळेच्या पटांगणावर पाणी साचला जात असल्याने त्या ठिकाणी मुरुम घालण्याची मागणी गावातील नागरीकांनी केली असता अजुनही ग्रामपंचायत ने लक्ष न देता दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरीकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरपंच रूपाली भेदे यांना काही नागरिकांनी गावातील समस्या बाबतीत बोलले असता सरपंच रूपाली भेदे म्हणतात मला काय करायचे आहे मी करेल तुमच्या प्रमाणे थोडी करणार आहे .मला करायचे नाही आहे असे उध्दट भाषेत सरपंच कडून बोलले जात असेल तर अशा सरपंच पदावर राहण्याची गरज काय? असा प्रश्न नागरिकांनी व्यक्त केला. एका वार्ड सदस्य यांना बोलले असता त्यांचे कडून असेच शब्दात बोलले जात आहे तर गावातील समस्या दुर कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामसेवक गावातील समस्याचा निराकरण न करता सरपंच च्या मर्जिनुसार काम करतो आहे.सचिवाचे काम पुर्ण गावातील करणे असतांना सरपंच ज्या गावातील आहे त्याच गावातील कामाला मंजुरी दिली जाते व टाकळी गावाचे संबंधित कोणत्याही बाबतीत कामे करायला तयार नाही त्यामुळे सचिव यांच्यावर सुध्दा कारवाई करण्यात यावी. अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत असतांनाही ग्रामपंचायत कडून आजपर्यंत आरो प्लांट दुरूस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरीकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.समजा एखाद्याला आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुलभूत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास यांना पण ग्रामपंचायत सर्वश्री जबाबदार राहील याबाबतीत टाकळी खमाटा येथील नागरीकांनी सह्यानिशी जिल्हा परिषद चे मुखकार्यपालन अधिकारी यांना तक्रारीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे. तरी संबंधित बाबतीत प्रशासनाने दखल घेवून टाकळी खमाटा येथील नागरीकांच्या समस्या दूर करण्यात याव्या व सचिवावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
———————————
गावात तीन वर्षापासून एकही काम करण्यात आले नसल्यामुळे ग्रामसभेत कित्येकदा विषय मांडून सरपंच रुपाली भेदे हे दुर्लक्ष करीत आहेत. उपसरपंच टाकळी चे असून सरपंच खमाटा चे असल्याने कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे टाकळी येथील तीन वर्षांपासून समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.अन्यथा ग्रामस्थ कडून ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
संदीप शेंडे
तंटामुक्त समिती अध्यक्ष
टाकळी (खमाटा)