3 ऑगस्ट रोजी नवोदय परीक्षेवर विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिर

45

 

 

चिमूर: जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षासाठी बसणाऱ्या खाजगी अनुदानित शाळा आणि इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेतील हिंदी, इंग्रजी व मराठी माध्यमांच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय तालुकास्तरीय नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता संत भैयूजी महाराज विद्यालय, पिंपळनेरी रोड चिमूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचा शुभारंभ प्रमुख अतिथी पत्रकार मनोज डोंगरे, वनपाल संतोष लोखंडे व मुख्याध्यापक सचिन पिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रम ओळख, प्रश्नपत्रिका स्वरूप आणि गणितातील सोप्या पद्धती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या खाजगी अनुदानित शाळा व इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळांमधील हिंदी, मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनि सहभागी व्हावे , असे आवाहन जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.