रोटरी क्लब चिमूर तर्फे शहीद पुलेश्वर बाबुराव शेडमाके चौकातील “स्मशान भूमी” येथे वृक्षारोपण

101

 

चिमूर- झाडांचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. वृक्षारोपण या भूमीसाठी, पर्यावरण संरक्षणासाठी, मानव विकासा करिता हिताचे आहे. मागील वर्षी रोटरी क्लब तर्फे स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण स्मशान भूमीतील काटेरी झुडूप काढून परिसर स्वच्छ करून जबाबदारी पार पाडली होती. याचे औचित्य साधत स्मशान भुमी येथे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त व्हावं, शांत वातावरण निर्माण व्हावं, स्मशानभूमीमध्ये येणाऱ्या लोकांना सावलीतून दिलासा मिळावा, या जागेचे सुशोभीकरण व्हावं आणि एक सामाजिक संदेश जावा म्हणून रोटरी क्लब चिमूर तर्फे शहीद पुलेश्वर बाबुराव शेडमाके चौकातील स्मशानभूमीमध्ये दि.३१ जुलै रोजी गुरुवार ला वृक्षारोपण करण्यात आले.मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनाचाच एक भाग आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात शांती मिळणे फार महत्त्वाचे आहे. या वेळी पिंपळ, वड, कडुनिंब, जांभूळ, गुल मोहर, अशोका, बेल, आपटा अशा महत्वाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण वेळी रोटरी क्लब चिमूरचे अध्यक्ष विनोद भोयर, सचिव राकेश बघेल, डॉ. महेश खानेकर, पवन ताकसांडे, विशाल गंपावर, खुशाब रोकडे, हरीश सारडा, कृषिमित्र अभिजित बेहते, कैलास धनोरे, प्रफुल बेत्तावार, विलास अल्लडवार, परेश दंदे, झाडे सर हजर होते.