अंशकालीन कला, कार्यानुभव, क्रीडा निदेशकाना न्याय मिळवून देणार-आमदार डाँ. सुधाकर अडबाले

81

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा-चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत अंशकालीन क्रीडा, कार्यानुभव, कला निदेशकाना न्याय मिळवून देणारच असे आश्वासन आमदार डाँक्टर सुधाकर अडबाले यांनी अंशकालीन क्रीडा,कार्यानुभव, कला,शिक्षक निदेशक संघाचे पदाधिकार्याच्या शिष्टमंडळाना दिली.
चंद्रपूर जिल्हा क्रीडा, कार्यानुभव, कला अंशकालीन निदेशक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंदोजवार यांचे नेतृत्वात जिल्हा पदाधिकाऱयांनी शिक्षक आमदार डाक्टर सुधाकर अडबाले यांची भेट घेऊन अंशकालीन क्रीडा, कला, कार्यानुभव निदेशकाच्या अनेक समस्या, शासनाचे या विषयावर होणारे दुर्लक्ष, सरासरी मानधन वाढ, पटसंख्या अट शिथिल करून सरसकट वर्ग 1 ते 8 असे मानक ठेवणे, सेवा हमी, अश्या अनेक मागण्या बाबत चर्चा झाली, स्थानिक प्रश्न तात्काळ संपर्क करून सोडविले तसेच त्यानंतर इतर महत्वाचे प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देणारच असे या पदाधिकाऱ्यांना आश्वासक हमी दिली.
यावेळी चंद्रपूर जिल्हा अंशकालीन क्रीडा, कार्यानुभव, कला, निदेशक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंदोजवार, उपाध्यक्षा शालू काळे, सचिव अमोल आवारी, विशाखा गुजर, नितीन चौथाले, रवींद्र तेलसे, रुपेश वनकर, गणेश आकेवार, अंजली धर्मपुरीवार, राजश्री चहारे, उर्मिला बंदुकवार, संजीवनी बावणे, अश्विनी तेलंग आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.