साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवू नका-माजी पंचायत समिति सदस्य प्रकाश पटले

153

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489

गोंदिया(दि.1ऑगस्ट):-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व लढा समाजातील सर्वच स्तरातील सर्वांगिण असल्याने त्याला एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवून नका असे प्रतिपादन माजी पंचायत समिति सदस्य प्रकाश पटले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर 105 व्या जयंतीदिनी सुरभि कम्प्यूटर एकोड़ी – गोंदिया येथे अन्नाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था ( एनजीओ ) एकोड़ी द्वारा आयोजित जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ अन्नाभाऊ साठे यांनी १८४२ च्या स्वातंत्र्य लढा, चले जाव आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असो वा गोवा मुक्ती लढ्याचे आंदोलन असो त्यात त्यांनी शाहीर अमर शेख व शाहीर गव्हाणकर यांच्या जोडीेने या लढ्याला फार मोठे योगदान दिले. म्हणून अशा देशभक्त नेत्याची जयंती सर्वांनी मिळून साजरी केली पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले यांनी ही केले.

 त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, अण्णाभाऊ साठेच हे खऱ्या अर्थाने वास्तववादी साहित्यिक होते. त्यांनी जीवनात बकाल आणि कंगाल वस्तीत पाहिले, भोगले व अनुभवले, तेच त्यांनी आपल्या साहित्यात मांडले. त्यांच्यासाठी ते आयुष्यभर लढले आणि लिहित राहिले अण्णाभाऊ हे पहिलेभलेही साम्यवादी चळवळीकडे झुकले होते. परंतु नंतर आंबेडकरी विचारधारेशिवाय गतंत्यर नाही,असे कळून चुकल्यानेच त्यांच्या साहित्याचा व चळवळीचा कल आंबेडकरी चळवळीकडे वळले.

श्रमिकांची व दलदलीमध्ये फसलेल्यांच्या घामाची महती गाणारा व त्यांनाच आपल्या साहित्याचा नायक बनवून त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविणारा खरा साहित्यसम्राट व लोकनेता होता, असे ही त्या म्हणल्या सदर कार्यक्रमाला द्वारका प्रसाद साठवने सरपंच, छगन बिरणवार, दिपक रिणायत, शुभम बोदेले, गोविन्द लिचडे, विनोद कोपरकर, अशोक कनोजे,जित्तु कनोजे, बालु भदाडे, दिपक रोकडे, राजु बरेकर, धर्मेन्द्र कनोजे, वासुदेव बिसेन, छन्नुताई हरिणखेडे, सत्यवतीताई जगणीत, राणुताई वासणीक, आराधनाताई मेश्राम, शिक्षिका अफ्रिनताई तेले, इशरतताई पठान, मितालीताई रिणायत, पोर्णिमा तायवाडे, टेकसिंह पुसाम , मुन्नीबाई ठाकरे, मयुर रिणायत, राजेशकुमार तायवाडे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था, गावातील तसेच परिसरातील नागरिक व सुरभि कम्प्यूटरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच सदर कार्यक्रमाचे संचालन माजी सरपंच व सुरभि कम्प्यूटर संचालक रविकुमार (बंटी) पटले यांनी केले तर आभार प्रदर्शन आरिफ़ पठान अन्नाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था यांनी केले.