पोलिसांची धडक कारवाई-अवैध तलवारीसह एकजण गजाआड

154

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.2ऑगस्ट):-शहरातील के. डी. फूड जंक्शन जवळील गल्लीत पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करत एक धारदार तलवार जप्त केली. ही कारवाई 1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 3.30 ते 4.00 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, राजुरा पोलिस स्टेशन अंतर्गत डी. बी. पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मारोती शंकर तग्रपवार (वय 32, रा. चुनाभट्टी वॉर्ड, राजुरा) याच्यावर छापा टाकून त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली. सदर तलवारीची एकूण लांबी 84 सें.मी. असून ती अवैधरीत्या त्याच्याकडे आढळून आली.

या प्रकरणी फिर्याद पो.उप.नि. भीष्मराज सोरते यांनी दिली असून आरोपीवर अपराध क्र. 352/2025 अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहेत.15 दिवसाच्या कालावधीतील ही दुसरी कारवाही आहे

सदर कारवाई पो.नी. सुमित परतेकी, पो.उ.नि. भीष्मराज सोरते, पो.कां. किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, शफीक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवाड, अविनाश बांबोळे आणि राजीव दुबे यांच्या पथकाने केली.