

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेटणे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी 2ऑगस्ट रोजी “एकपेड मा के नाम”, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या उपक्रमांतर्गत वृक्ष वाटप करण्यात आले.
“आयुर्वेदामध्ये माणसाच्या आरोग्याचे अमृत समजले जाणाऱ्या “शेवगा” या रोपाचे सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आर्ट ऑफ लिविंग, केंद्र-पुसेगाव व वेटणे गावचे शिक्षण प्रेमी मा.अमृतभाऊ नलवडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोपे वाटण्यात आली व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अमृत नलवडे यांनी मार्गदर्शन करताना झाडाचे महत्व पटवून देताना म्हणाले अनेक झाडांना सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे. लोक त्यांची पूजा करतात आणि त्यांना पवित्र मानतात.झाडे निसर्गाशी आपले नाते जोडतात आणि आपल्याला शांतता आणि आनंद देतात.
जगातील तापमान वाढ, प्रदूषण आणि नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी झाडांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.आपल्या पुढील पिढ्यांसाठी एक चांगले जीवन जगण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे वाचवणे आवश्यक आहे.
राजापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री .अजित निकाळजे साहेब यांनी एक पेड मा के नाम या उपक्रमाविषयी व वृक्षारोपणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजापूर केंद्राचे टेक्नोसेवी शिक्षक श्री. आशिष डंगारे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.संग्राम जाधव सर उपशिक्षिका शोभा माळवदकर मॅडम,अंगणवाडी सेविका मदतनीस, विद्यार्थी पालक व वेटणे ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते



