

चिमूर – चंद्रपूर जिल्हयात निवडणुकीचे वारे लागले असतांना वंचित बहुजन आघाडीची चिमूर विधानसभा आढावा बैठक संपन्न झाली.
वंचित बहुजन आघाडी चिमुर, नागभीड व ब्रम्हपुरी नगरपरिषद निवडणुका जोमाने व ताकदीने लढनार आहे व तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढनार अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभमभाऊ मंडपे यांनी दिली.
यावेळी सर्व जिल्हा परिषद सेक्टर प्रमुख व पंचायत समिती सेक्टर प्रमुख व सर्व बूथ अध्यक्ष पदाधिकारी उपस्तित होते. यावेळी या आढावा बैठकीत अनेक ठरावही मंजूर करण्यात आले. सर्व जिल्हा परिषद क्षेत्रानामध्ये कार्यकर्ता मेळावे घेण्यात यावे, सोमनाथ सूर्यवंशी यांना ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी न्यायालयीन लढाई लढून न्याय दिला त्याबद्दल जनजागृती करणे, महाबोधी महाविहार मुक्ती अंदोलन जनजागृती करणे असे ठराव घेण्यात आले.
यावेळी आढावा बैठकीला अध्यक्ष म्हणून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे, जिल्हा सल्लागार एन. आर.कांबळे, तालुका अध्यक्ष डाँ. बाळासाहेब बन्सोड, महासचिव लालाजी मेश्राम, शहर अध्यक्ष थुल, युवा चिमुर अध्यक्ष रवी शेंडे, मनोज राऊत, आकाश भगत, राजु घोनमोडे, जनार्धन खोब्रागडे गोपी घुटके, कैलास वाघमारे, अरुण मेश्राम आदी पदाधिकारी उपस्तित होते.



