

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.5ऑगस्ट):-महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा गंगाखेड शाखेच्या अध्यक्ष वगळता संपूर्ण पदाधिकारी यांनी तडकाफडकी राजीनामे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे देण्यात आल्याने औट घटीकेचे पदाधिकारी ठरले आसून असे काय घडले संपूर्णपणे पदाधिकारी कार्यमुक्त झाल्याचे गुढ गुलदस्त्यातच आहे नुतन कार्यकारिणीची निवड अध्यक्ष रामप्पा दावलबाजे कधी करणार याकडे लक्ष लागुन आहे.
महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा गंगाखेड शाखेची निवड जून मध्ये सर्वानुमते करण्यात आली होती या बैठकीस विभागीय अध्यक्ष मधुकर अप्पा राउत जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ नगरसाळे, भास्करराव देवडे, किरण अप्पा क्षिरसागर,खंदारे, विजय अप्पा घोडेकर उपस्थित होते यात सर्वानुमते रामाप्पा दावलबाजे यांची अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष बाळासाहेब गौरकर उपाध्यक्ष गोपाळ बंडू सेठ कात्रे प्रल्हाद साखरे सचिव भगवानराव बोडके कोषाध्यक्ष सुरज गौरकर सह सचिव अतुल दावलबाजे संघटक बाळासाहेब चोधरी प्रसिध्दी प्रमुख अमोल फुलारी ज्येष्ठ सल्लागार राजेश्वर गौरकर प्रभाकर दावलबाजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.
या झालेल्या निवडीने मोजक्या काही समाज बांधवात नाराजी आसल्याचे दिसुन आली पण बैठकीत नाराजी व्यक्त केली नाही परीणामी धुसपुस सुरूच होती तर पदावर नसताना सुध्दा काहीनी हस्तक्षेप सुरूच ठेवला होत या सर्व बाबी अध्यक्षाची मुक संमती आसल्याचे दिसुन आल्याने नुतन पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष सतीश नगरसाळे यांच्या उपस्थितीत दिलेल्या राजीनाम्यात स्पष्ट केले आम्ही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतील सदस्य काही वैयक्तिक कारणामुळे कार्यरत असलेल्या पदावरून आम्हाला कार्यमुक्त होणे आवश्यक वाटत आहे.
कार्यमुक्त झाल्यां नंतर सुद्धा समाजाच्या आवश्यक कामकाजात आम्ही सक्रिय सहभाग ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आमचे राजीनामा स्वीकार करून आम्हाला पदावरून मुक्त करण्याची मागणी कार्याध्यक्ष बाळासाहेब गौरकर उपाध्यक्ष गोपाळ (बंडू शेठ) काञे सचिव भगवानराव बोडके सह सचिव अतुल दावलबाजे कोषाध्यक्ष सूरज गौरकर संघटक-सखाराम (बाळू) चौधरी प्रसिद्धी प्रमुख अमोल फुलारी ज्येष्ठ सल्लागार राजेश्वर गौरकर प्रभाकर दावलबाजे यांनी करत राजीनामे दिले.
गंगाखेड प्रातीक तैलिक महासभेचा नुतन पदाधिकारी यांनी राजीनामे दिल्याने केवळ एकमेव अध्यक्ष रामप्पा दावलबाजे पदावर आहेत पण आज पर्यत नुतन कार्यकरणीची निवड करण्यात आली नाही तर राजीनामे का दिले याचे आत्मचिंतन सुध्दा केले नसल्याचे दिसुन आले आहे.



