गार्ड ड्युटी बजावणाऱ्या पोलीस अंमलदाराना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या. पोलीस बॉईज ची जिल्हा प्रशासनास मागणी

84

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड-सातारा(दि.5ऑगस्ट):- सातारा शहरातील मा.जिल्हा कोर्ट, मा. कोषागार कार्यालय सातारा मा. जिल्हाधिकरी यांचा बंगला , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, , MIDC मधील मतमोजणी शासकीय गोडाऊन , K4 पॉईंट इत्यादी ठिकाणी सुरक्षा करीत जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी गार्ड म्हणून कायमस्वरूपी तैनात असतात व आपले कर्त्यांव बजावत असतात. परंतु या वरील सर्व ठिकाणी पायाभूत सुविधांची वानवा असलेचे दिसून येत आहे.

या विविध ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रसाधन गृहे, विश्रांती ची सुविधा, पिण्याची पाण्याची सोय इत्यादी सुविधा चांगल्या प्रमाणात उपलब्ध नसलेने सदर ठिकाणी २४ तास गार्ड ड्युटी वर असणाऱ्या कर्मचारी यांना विविध मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि याचा परिणाम त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे परिणामी पोलीस कुटुंबियांना सुद्धा आरोग्याच्या सुविधा सुविधा भेडसावत आहेत. याबाबत पोलीस बॉईज सातारा यांच वतीने मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. माने यांना निवेदन देणेत आले.

विविध ठिकाणी जेथे २४ तास पोलीस कर्मचारी पहारा देत असतात अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व पायाभूत सुविधा पुरविणेत यावेत जेणेकरून पोलीस कर्मचारी यांचे मनोबल उंचावेल अशी विनंती करणेत आली यावर अप्पर जिल्हाधिकारी श्री. माने साहेब यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत वरील सर्व ठिकाणी सोयी सुविधा पुरविणे करिता जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करणे करिता तात्काळ कार्यवाही करणेत येईल असे आश्वासन दिले. यावेळी वैभव माने, संतोष साठे अनिल खुडे, प्रसाद धुमाळ आदी उपस्तिथ होते.