भद्रावती येथे शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

54

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.5ऑगस्ट):-महसूल सप्ताह – 2025 अंतर्गत भद्रावती तहसील कार्यालयाच्या वतीने भद्रावती मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून वरोराचे उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, पोलिस निरीक्षक पारधी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, अनिल धानोरकर, सुनिल नामोजवार, प्रफुल चटकी, विजय वानखेडे, सुधीर सातपुते, डॉ. सिंग, नायब तहसीलदार काळे व मनोज आकनूरवार उपस्थित होते.

   सदर शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले वाटप तसेच जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाकडून विविध तपासण्या, तहसील कार्यालय अंतर्गत राशनकार्ड, संजय गांधी निराधार, मतदान नोंदणी, शेतकरी ओळख पत्र, ई पीक पाहणी बाबत माहिती देण्यात आली. बँकेतर्फे त्यांच्या योजनांबाबत, दुय्यम निबंधक कार्यालयकडून शासनाच्या दस्त नोंदणीबाबत माहिती, भूमी अभिलेख कार्यालयतर्फे सनद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन समीर वाटेकर यांनी तर आभार मनोज आकनूरवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्राम महसूल अधिकारी रवी तल्हार, गुरुदेव तळवेकर, कोमल जोशी, शितल लिहीतकर, प्रिती बोरसरे, महसूल सेवक दिलीप नागपुरे, अशोक पेंदोर व अरविंद तोडकर अदींनी सहकार्य केले.

चंद्रपूर येथे प्रमाणपत्र व दाखले वाटप : चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील मौजा आरवट, पिपरी, शेणगाव, यशवंतनगर, पडोली व अजयपुर या गावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आयोजित करून उपस्थित विद्यार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच नागरीक, विद्यार्थी, शेतक-यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना व अॅपद्वारे अॅग्रिस्टाक नोंदणी, ई-पीक पाहणी, इ. माहिती देण्यात आली.

यावेळी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजु धांडे, यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व प्रमाणपत्राचे वितरण केले. महसूल सप्ताहात जास्तीत जास्त संख्येने नागकिांनी सहभागी होऊन विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार चंद्रपूर यांनी केले आहे.