मदनापूर येथे नैसर्गिक शेतीचे महत्व या विषयावर कार्यशाळा-तालुका कृषी कार्यालयांचा उपक्रम

71

 

 

चिमूर- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोरा यांच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियानांतर्गत चिमूर तालुका कृषी अधिकारी पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा मदनापूर येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कन्नाके यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. आर.व्ही. महाजन यांनी नैसर्गिक शेतीतील महत्त्वाचे घटक ,नैसर्गिक शेतीतील निविष्ठा जसे की बिजामृत, जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क या सर्वांचे बनवण्याच्या पद्धती, लागणारे साहित्य व फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रा. एन. डी. गजबे यांनी नैसर्गिक शेतीची तत्वे, नैसर्गिक कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले कृषी पर्यवेक्षक आर.बी.सोनवणे यांनी कृषी विभागातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
उप विभागीय कृषी अधिकारी आर.एच.चव्हाण यांनी pmfme योजनेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषिसेवक एस.एन.चासकर यांनी केले. सदर कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी शेंडे , निखारे, तसेच कृषी सहाय्यक पी.पी.पवळ, बी. बी. येवले, पी. जी. सदगर, एस.डी. किनकिने, के.पी. घाटे, एन.बी. वामन, के.कडव, कृषि सखी, शेतकरी, महिला शेतकरी उपस्थित होते.