

प्रतिनिधी(अनिल साळवे, 8698566515)
गंगाखेड तालुक्यातील मोजे चाटोरी गावातील वडिलोपार्जित मालमत्तेवर शेजारी व्यक्तींकडून ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यासोबत संगणमत करून नमुना नंबर आठ लावून अतिक्रमणाचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप चाटोरी येथील रहिवासी सुरेश बालासाहेब किरडे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी जिल्हा प्रशासन व विविध विभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून अद्याप कार्यवाही न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाकडून ग्रामविकास मंत्रालय यांच्या अधिसूचनेनुसार मिळालेल्या जागेचा नमुना नंबर 981 चे एकूणक्षेत्रफळ4995 वाटणी पत्रक नुसार
दिनांक १४ सप्टेंबर २०१८ रोजी केलेल्या मालमत्तेच्या वाटप पत्रानुसार सुरेश किरडे यांना ४५ फूट x ३७ फूट जागा व त्याचे क्षेत्रफळ एकूण १६६५ चौ. फुट जागा त्यांच्या नावे झालेली आहे. मात्र, ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्यांच्या वडिलांनी वाटून दिलेल्या जागेच्या मालमत्ता क्रमांक १२१३/३ साठी चुकीची चतु:सिमा दाखवली गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मूळ मालमत्ता क्रमांक ९८१ साठी दाखवलेली लगत सीमेमध्ये आणि नोंदींमध्ये विसंगती असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, माधव लक्ष्मण किरडे व मुंजा माधव किरडे यांनी ग्रामपंचायतीच्या काही तत्कालीन पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून मालमत्ता क्रमांक १३८२ (३३x२७ फूट) वर चुकीची नोंद करून त्यांच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. या अतिक्रमणाची तसेच पुढील अनधिकृत नोंदीची गंभीर दखल घेऊन सदर नोंद रद्द करावी आणि दोषींवर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम १९७९ अंतर्गत कारवाई करून प्रशासकीय कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
त्यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी आदी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “वेळेत कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती पालम कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल आणि यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल.”
सदर प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांतूनही होत आहे.



