लाखांदूर पोलिसांकडून अवैध रेती वाहतुकीवर कारवाई एकूण 6,06000/ रुपयाचा गुद्देमाल जप्त 

106

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.9ऑगस्ट):- पोलीस स्टेशन लाखांदूर अंतर्गत आरोपी नामे राहुल दौलत भुरले वय 27 वर्षे राहणार आसोला तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा यातील फिर्यादी हे स्टाफसह रेती रेड कारवाई करीता खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना यातील नमूद आरोपी मौजा लाखांदूर ते पवनी रोड सावरगाव फाटा जाणारा रोडवर मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील एक स्वराज्य कंपनीचा 834 एक्स एम लाल पांढऱ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 33 एफ 5241 ज्याचा चेचीस WSTE24428149466 व इंजिन क्रमांक 33-1008SYE 02158 असलेला किंमत अंदाजे 5,00,000/रुपये विना क्रमांकाची लाल रंगाची टॅली किंमत 1,00000/रुपये असा एकूण 6,/06000 रुपये गुद्देमाल विना पास परवाना रेतीची अवैध वाहतूक करून पर्यावरणाचा नुकसान करून विना वाहतूक परवाना अवैधरित्या चोरीची रेती वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली व रेतीसह एकूण 6,06000/रुपयाच्या गुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून कायमी अप. क्रमांक 233 / 2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम 7, 9, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नुरुल हसन ,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जौजारकर ,पोलीस अमलदार चव्हाण यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन लाखांदूरचे अधिकारी करीत आहेत.