लोकशाहीचा कणा ‘मतदार’राजा धोक्यात:व्हीव्हीपॅट नकोच; बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या-बसप महासचिव डॉ.हुलगेश चलवादींची मागणी

88

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 पुणे(दि.11ऑगस्ट):- राज्यात दिवाळीनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘ईव्हीएम’वर घेण्याचा घाट सरकारने घातलाय. असे करतांना मात्र, व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही. लोकशाहीचा कणा ‘मतदार’राजा धोक्यात असतांना राज्य निवडणूक आयोगाची पर्यायाने सत्ताधाऱ्यांची ही कृती आणखी संशय आणि तेवढाच संभ्रम निर्माण करणारी आहे. राज्यातील मतदारांचे अमूल्य मत चोरण्याचा प्रयत्न सर्रास होवू शकतो. निवडणुकांमध्ये त्यामुळे ‘व्हीव्हीपॅट’ही नको आणि ‘ईव्हीएम’ देखील नकोच.साध्या ‘बॅलेट पेपर’वर निवडणुका घ्या,अशी आग्रही मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी, मा.नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.११) केली.

‘ईव्हीएम हटाओ,लोकशाही बचाओ’ या घोषणेचा पुनरुच्चार यानिमित्ताने त्यांनी केला. देशावासियांच्या मनात ईव्हीएम बद्दल अगोरपासूनच साशंकता आहे. ‘नागरिकांचे, नागरिकांसाठी, नागरिकांकडून’ या लोकशाहीच्या तत्वानूसार जवळपास ८५% नागरिकांचा जर ईव्हीएमवर अविश्वास असेल, तर सरकार निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ का लादतेय? असा सवाल डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला. जगातील मोठमोठ्या देशांनी ईव्हीएम नाकारले. पंरतु, सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाने ते स्वीकारने अनाकलनीय आहे. या निवडणूक यंत्रणेतील पारदर्शकतेच्या अभावी बॅलेटपेपर योग्य पर्याय आहे,असा दावा डॉ.चलवादींनी केला. 

निवडणुकांमधील पारदर्शकतेसाठी कुठल्याही सरकारने आतापर्यंत पावले उचलली नाहीत. उलटपक्षी सत्तेचा दुरूपयोग करीत बहुजनांची नावे मतदार यादीतून गहाळ करण्याचे तसेच त्यांचे मत चोरण्याचे काम करीत संविधान निर्माते, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकारांचे हनन करण्याचे काम केले. आता ‘स्थास्वसं’च्या निवडणुकीमध्ये देखील वंचित,उपेक्षित, शोषित घटकांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांनी विशेषत: बहुजनांनी सजग राहण्याची ही वेळ असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. 

आतापर्यंत दर पाच वर्षांनी मनपा प्रभाग रचनेत बदल करण्याची पद्धत होती. यंदा मात्र २०१७ च्या प्रभाग रचनेनूसारच निवडणुका घेतल्या जातील.पंरतु, लोकसंख्येच्या आधारे प्रभागांची पुर्नरचना करणे, काळाची गरज आहे. भौगोलिक दृष्टिकोणातून ही रचना केली जावी. तळागाळातून आलेल्या नेतृत्वाला संधी मिळावी आणि संविधानाच्या तत्वाच्या पुर्ततेसाठी हे आवश्यक असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.