श्री शिवाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

58

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजूरा- श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त शपथ आणि हर घर तिरंगा अभियान जनजागृती रॅली काढण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी हर घर तिरंगा अभियान राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे राबविण्यात येत आहे, आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्याना शपथ देण्यात आली, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम वारकड, पल्लवी मुंगुले समुपदेशक, रश्मी बोरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, उपजिल्हा रुग्णालय, राजूरा उपस्थित होते.
प्रा. गुरुदास बल्की, रासेयो जिल्हा समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना युवा दिनानिमित्त शपथ दिली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि हर घर तिरंगा जनजागृती मोहिम रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने माय भारत चे स्वयंसेवक व विद्यार्थी सहभागी होते.