कृष्ण गीता नगर येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकुळ !… शंकर पाटील यांचे घरातील ३०,००० रोख व सोन्याची अंगठी लंपास !…

81

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथील रहिवासी शंकर जनार्दन पाटील, प्लॉट नं – ३८ यांच्या घरी दिनांक ११ ऑगष्ट, २०२५ रात्री अज्ञात चोरट्यांनी घर फोडले.
पाटील सहकुटुंब सहपरिवारसह शहादा येथे एक दिवसासाठी गेले असता आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४ : ३० वा. कृष्णा गीता नगर येथे आपल्या घरी परत आले पाहता तर काय चोरट्यांनी घर फोडलेले लक्षात आल्यावर त्यांनी कॉलनीवासीयांना आवाज दिला. सर्व कॉलनिवासी एकत्र आल्यावर घरात प्रवेश केला तर घरातील कपाट, किचन मधील डबे व बेडरूम मधील बेड व कपाट अस्तव्यस्त स्वरूपात दिसले. शंकर पाटील यांच्या सांगण्यावरून घरातील कपाटात ठेवलेले तीस हजार रुपये रोख व काही सोन्याचे दागिने लंपास केलेले आढळले. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेली घटना सांगितली. या कॉलनीतील घटनेमुळे कॉलनीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अगोदर कृष्ण गीता नगर मध्ये अनेकदा चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.