शेतकरी अजूनही स्वत:ला गुलाम समजतो.

81

 

भारतात ६० टक्के शेतकरी आहेत.महाराष्ट्रात ही संख्या जास्त आहे.त्यांच्या मतांनी महाराष्ट्रात २०० आमदार निवडून येतात.ते स्वताला शेतकऱ्यांची मुले म्हणवून घेतात.पण अजून तरी महसूलमंत्री बावनकुळे साहेब यांनी जे विधानसभेत जे शेतकरी हिताचे निर्णय घेतले ते कोणत्याही मराठा आमदारांनी घेतलेले नाहीत.उलट माझ्या जळगाव जिल्ह्यातील मराठा आमदारांनी शेतकरी हिताला विरोध केला आहे.मी जळगाव जिल्ह्यातील असल्याने अनुभव घेऊन बोलतो.खात्री करून सांगतो.इतर जिल्ह्यातील आमदारांचा ज्यांना अनुभव असेल तो त्यांनी सांगितला पाहिजे.
आज तरी महसूल प्रशासनात शेतकऱ्यांची मुले खूप आहेत.काही तर स्वतः सांगतात.कि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.पण प्रत्यक्षात तशी मदत किंवा सेवा करतांना आढळत नाही.शेतकऱ्यांना रोहिंग्या सारखी तुच्छतेची वागणूक देतात.
याला शेतकरी सुद्धा जबाबदार आहेत.शेतकरी मुले शिकवतो.नोकरीला पाठवतो.पण त्यांना नितीमत्ता शिकवत नाही.कि , तुझ्या कडे कोणीही नागरिक प्रामाणिक कामासाठी आला तर तू त्याला आदराने बोलवून मदत केली पाहिजे.किमान तुझ्या अधिकारात जे शक्य आहे,ते तरी काम केले पाहिजे.
माझा अनुभव आहे. निरीक्षण आहे कि शेतकऱ्यांची मुले सरकारी नोकरीत गेली कि ते शेतकऱ्यांना जास्त लुटतात.फजिती करतात.तेंव्हा ते इंग्रजांची मुले समजून शेतकऱ्यांना तुच्छ समजतात.अशिक्षितपणाचा गैरफायदा घेतात.मला वेळ नाही सांगून टाळाटाळ करतात.हे वेदनादायी आहे.
काल मी जळगाव कलेक्टर कडे शेतकरी घेऊन गेलो.शेत रस्ता साठी अर्ज होते.कलेक्टर आयुष प्रसाद साहेबांनी आमचे म्हणणे ऐकून महसूल चे विधीज्ञ एड खेवलकर यांना ही जबाबदारी सोपवली.त्यांनी शेतकऱ्यांचे सर्वच अडचणी ऐकून संबंधित तहसीलदारांना सुचना दिल्या.जर अजूनही काही अडचण आली तर माझ्या कडे या ,असे आश्वासन दिले.
काल शेतकरी आणि अधिकारी आमनेसामने बोलणे झाले.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.जर असाच व्यवहार तहसीलदार, प्रांताधिकारी आणि आमदार खासदार मंत्री यांनी केला तर शेतकरी समस्या मुक्त होतील.
माझा असा अनुभव आहे कि, आमच्या जळगाव जिल्ह्यातील आमदार हेच शेतकरी विरोधात काम करीत आहेत.तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांना उलट सुचना देऊन होणारे काम बिघडवत आहेत.तरीही जर जास्त आगळीक केली तर आमदारांनी कऱ्हाड सारखी माणसे पाळलेली आहेत.
जर कोणी आमदाराला यावर आक्षेप असेल तर आम्ही जनतेसमोर आमनेसामने चर्चा करायला तयार आहोत.नाही आमनेसामने आले तरीही आम्ही आमचे अनुभव उघड उघड मांडत आहोतच.
सरकारी नोकर आणि आमदार एकत्र येऊन रेती मातीतून पैसा कमावतात.आम्ही या धंद्याच्या आड येत नाही.पण शेतकऱ्यांचे शोषण करीत असतील तर आता शेतकरी मतदारांनी विचार केला पाहिजे.धर्म आणि दैवतांच्या आडून कोणी टोळी बनवत असतील तर शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे.एक दिवसांची दारू,मटण आणि हजार पाचशे रूपयात आपले मत अशा गुंड टोळ्यांना देऊ नये.तरच यावर लगाम लागू शकते.
मी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जाऊन भेटतो.संबोधन करतो.कि , किमान शेतकऱ्यांच्या मुलांनी तरी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.असे शिकवा.शेतकऱ्यांनी बुद्धी ज्ञान निती ची कास धरली पाहिजे.तरच शेतकऱ्यांचा उद्धार होऊ शकतो.
१०० शेतकरी आमचे भाषण, प्रबोधन शांततेत ऐकतात.पण एक गावठी पिऊन आलेला माणूस १०० शेतकऱ्यांवर हावी होतो.ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचे हे जिवंत उदाहरण आहे.तसाच प्रकार राजकारणात व प्रशासनात चालू आहे.गुंडगिरी व खाबूगिरीचे थैमान चालू आहे.याची लगाम शेतकरी मतदारांच्या हाती आहे.योग्य बदल करण्याची संधी आहे तरीही गुलाम कसा?

 

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
मो.९२७०९६३१२२