ग्रामरोजगार सहायकाचे पाच महिन्यापासून मानधन न मिळाल्याने काम बंद आंदोलनचा इशारा..

173

 

संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378

नागभीड – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरळीत सुरु आहे. मात्र ग्रामरोजगार सहायकांचे पाच महिन्यापासूनचे मानधन अजूनपर्यंत मिळाले नाहीं. ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची पाळी आली आहे.
पंचायत समिती ला जाणे येणे करण्यासाठी गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी फार अडचण निर्माण झाली आहे.
शासकीय काम आणि बारा महिने थांब अशी म्हण आता अडिअडचणीत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या रोजगार सहायकाना लागू पडत आहे.
15 आगस्ट पर्यंत मानधन देण्यात आले नाहीं तर 19 आगस्ट पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन नागभीड तालुका ग्रामरोजगार सहायक संघटना
यांनी स्नेहल लाड गट विकास अधिकारी पंचायत समिती नागभीड यांना देण्यात आले आहे.
शासनाने ग्रामरोजगार सहायकांना थकीत मानधन लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी संघटनेची
मागणी आहे..