पी. डी. पाटीलसाहेबांनी कराडच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले- डॉ. प्रकाश पवार

53

 

 

कराड – महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक विभूतींनी सर्वस्व अर्पण करून आपले मोलाचे योगदान दिले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राष्ट्र उभारणीस महत्त्व देऊन आदरणीय पी. डी पाटीलसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून कराडची जबाबदारी दिली. त्यावेळी पी. डी. पाटीलसाहेबांनी आपल्या कौशल्यांच्या जोरावर कराड नगरीचा कायापालट केला. साहेबांनी स्थानिक परिसराचा बारकाईने अभ्यास केला आणि कराडच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. असे विचार थोर साहित्यिक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.
ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व श्री.आर. के. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, संख ता.जत जि.सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय पी.डी. पाटील व्याख्यानमालेत “स्थानिक स्वराज्य संस्थांनाचे कामकाज, सामूहिक विकास व सामूहिक कारखानदार” या विषयावर बोलत होते.

पी डी पाटील साहेबांनी जशी कराड परिसरात विविध क्षेत्रात प्रगती केली तशीच प्रगती श्री आर के पाटील सरांनी संख परिसरात गरीब व गरजू विध्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवून आणली. पी. डी.पाटील साहेबांचे कार्य कराडपूरते मर्यादित राहता कामा नये. त्यांच्या कीर्तीचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावा यासाठी अशा व्याख्यानमाला गरजेच्या आहेत. या व्याख्यान मालेला शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संखचे अध्यक्ष मा. डॉ. आर के पाटील हे अध्यक्षस्थानी होते.
या व्याख्यानमालेस श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे जनरल सेक्रेटरी, मा. श्री.अल्ताफ हुसेन मुल्ला साहेब, मा. प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड, शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक किरण पाटील, श्री आर के कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संख चे प्राचार्य डॉ. संजीव दळवाई यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस. एच.बुरुंगले, उपप्राचार्य एस. एल. महामुनी व प्राध्यापक, वेणूताई चव्हाण कॉलेज कराडचे उपप्राचार्य आर. ए. कांबळे, पर्यवेक्षिका एस एस मधाळे, प्राध्यापक व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. पी. व्ही. वाठारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शिखरे एस. एम. यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. वासोली डी व्ही. यांनी आभार व्यक्त केले.