

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489
भंडारा(दि.13ऑगस्ट):-पोलीस स्टेशन भंडारा अंतर्गत आरोपी नामे नितेश सुखराम मडामे वय 37 वर्षे राहणार भगतसिंग वार्ड नवीन टाकळी भंडारा (ट्रॅक्टर चालक) कैलास दिलीप व्यवहारे वय 32 वर्षे राहणार भगतसिंग वार्ड टाकळी भंडारा( ट्रॅक्टर मालक) यातील फिर्यादी हे स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना मौजा शास्त्री चौक भंडारा येथे मिळून आल्याने यातील आरोपी क्रमांक एक यांनी आरोपी क्रमांक दोन यांचे सांगण्यावरून आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विनापास परवाना शासनाचे मालकीच्या रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने व पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने नमूद आरोपीच्या ताब्यातून 01 ब्रास रेती किंमत 6000/ रुपये 735 एफई ज्याचा इंजिन क्रमांक
CJ1354KHO10068 चेचीस क्रमांक MBNAaJ48FKTK 18806 असलेला किंमत 5,00,000/रुपये, एक बिना क्रमांकाची जिच्या ट्रॉलीचा चेचीस क्रमांक VLEGTT RPO 12014156 असा असलेली किंमत 1,00000/असा एकूण 6,06000/रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक 1080/2025 कलम 303(2)49 भारतीय न्याय संहिता सर्व कलम 7,9, पर्यावरण संरक्षण अधिनियम मोवाका अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नुरुल हसन पोलीस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर,यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार दोनोडे भंडारा यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन भंडाराचे अधिकारी करीत आहेत.
*सिहोरा*पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत आरोपी नामे टेकचंद सूरजलाल शरणागत वय 44 वर्षे राहणार मुरली तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथील फिर्यादी हे स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना मौजा वारपिंडकेपार येथे आरोपी हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक MH34BF9702 शासनाच्या मालकीची अंदाजे 01 ब्रास रेती ची अवैधरित्या विनापरवाना शासनाच्या महसूल बुडवून पर्यावरणाचा ऱ्हास करून अवैधरित्या चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून 01 शेंदरी रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर मॉडेल क्रमांक 834 याचा क्रमांक MH34BF9702 इंजिन क्रमांक 331008-SZF02796 व चेचीस क्रमांक WZTF25428156313 असा असलेला व त्याला मागे 01 लाल रंगाची विना क्रमांकाची ट्राली एकूण किंमत 6,00000/रुपये ,रॅलीमध्ये अंदाजे 01 ब्रास रेती किंमत 6000/रुपये, 6,06000/रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून अप. क्रमांक 209/2025 कलम 305(ई) भारतीय न्याय संहिता सह कलम 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सह कलम 7 ,9, पर्यावरण संरक्षण अधिनियम मोवाका अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नुरुल हसन ,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे ,पोलीस निरीक्षक चिंचोळकर, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पाटील भंडारा ,यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन सिहोरा चे अधिकारी करीत आहेत.



