

▪️या वयापर्यंत जगणारी कदाचित ही शेवटची पिढी असेल — प्रा आर एन महाजन
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगाव(दि.13ऑगस्ट):-येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी विभागाचे निवृत्त कर्मचारी प्रल्हाद कचरू चौधरी उर्फ पीके अण्णांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा (81 वा वाढदिवस) मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माणूस मेल्यानंतर स्मशानभूमीत केलेलं कौतुक ऐकण्यासाठी ती व्यक्ती या जगात नसते परंतु व्यक्ती जिवंत असतांना त्याच्या जगण्याचा सोहळा व्हावा यापेक्षा विलक्षण योग तो कोणता. असाच अनुभव लहान माळी वाडा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कचरू चौधरी यांनी घेतला. त्यांचा 81 वा वाढदिवसाच्या निमित्ताने परिवाराने सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात साजरा केला. विलोभनीय सजावट, दिव्यांची आरास, नातेवाईकांचा उत्साह, सामाजिक – राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते.
प्रास्ताविकपर मनोगतात लक्ष्मणराव पाटील यांनी पीके अण्णांचा जीवनपट उलगडला. कौटुंबिक हलाखीची परिस्थिती, नोकरीतील कालावधी, मुलांचे शिक्षण – लग्न तसेच निवृत्तीनंतरचा प्रवास श्री पाटील यांनी सांगितला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना अण्णांच्या व्यक्तिमत्वा विषयी तसेच त्यांच्या परिवारा विषयी सखोल माहिती सांगितली. यामध्ये तेली समाजाचे अध्यक्ष सुनिल चौधरी, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, भाजपचे कैलास माळी, ऍड संजय महाजन, अमळनेरचे केतन शाह, अरुण चौधरी, पारोळ्याचे राजेंद्र चौधरी, जळगावचे प्रदीप बोरसे आदींचा समावेश होता.
सामाजिक समरसता मंचचे अध्यक्ष प्रा आर एन महाजन यांनी कुटुंब संस्थेचे बदलत जाणारे स्वरूप मांडले. आई – वडिलांची सेवा प्रामाणिकपणे करणाऱ्या मुलांनी कुठलेही धार्मिक अधिष्ठान केले नाही तरी चालेल. आपल्या घरातील जिवंत दैवतांचा सांभाळ करा असे सांगून, या वयापर्यंत जगणारी कदाचित ही शेवटची पिढी असेल असे मत प्रा महाजन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जळगाव येथील बऱ्हाटे साहेबांनी पी के चौधरी यांच्या सेवा कालावधी बद्दल उल्लेख करतांना एक सच्चा माणूस अशा शब्दांत गौरव केला.
मुलांनी अतिशय सुंदर कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल परिवाराचे कौतुक केले. गायत्री परिवाराचे चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध मंत्रोच्चार करून पी के चौधरी व सुमनबाई चौधरी यांच्या दीर्घायुष्याची मंगलकामना केली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी पी के चौधरी व सुमनबाई चौधरी यांचा शाल, श्रीफळ व विविध भेटवस्तू देऊन सत्कार केला. त्यानंतर सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी स्नेह भोजनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन व संचालक मंडळ, पाटील समाजाचे अध्यक्ष माधवराव पाटील व संचालक मंडळ, चौधरी समाजाचे अध्यक्ष सुनिल चौधरी व संचालक मंडळ, मराठे समाजाचे अध्यक्ष पांडुरंग मराठे व संचालक मंडळ, माजी नगरध्यक्ष निलेश चौधरी, उबाठा सेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, राजेंद्र ठाकरे, भागवत चौधरी, भाजपचे पुनिलाल महाजन, चंदन पाटील, गोपाल पाटील, भिमराज पाटील, दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर, शिवाजी चौधरी, शिवसेनेचे वासुदेव चौधरी, काँग्रेसचे सुनिल सोनार, सेवानिवृत्त संघटनेचे पोतदार काका व त्यांचे सहकारी, चौधरी गुरुजी, रतन गुरुजी, भिका सुकलाल पवार, चंदन हॉटेलचे किशोर चौधरी, पिंप्रीचे देविदास चौधरी, पारोळ्याचे श्रावण चौधरी, अमळनेरचे अनिल महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुनिल चौधरी, अनिल चौधरी, ईश्वर चौधरी, रत्नाबाई चौधरी तसेच पवार कुटुंबीय यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप महाजन, दिलीप पाटील, राजेंद्र महाजन, हिरामण (जिभू) पाटील, रमेश मराठे, राजू महाजन, किशोर महाजन, रामचंद्र महाजन, विठोबा पाटील, विलास महाजन, आबा महाजन, आत्माराम चौधरी, शरद चौधरी, गोपाल चौधरी यांच्यासह लहान माडी वाडा मित्र परिवार, समस्त चौधरी समाज, पाटील समाज, माळी समाज व मराठे समाजाच्या युवक मित्र परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले.



