चंद्रपूर वन प्रबोधिनीमध्ये सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थी आणी शिक्षकांकरीता हवामान बदल व पर्यावरण संरक्षण विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

97

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179

चंद्रपूर – चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे हवामान बदल व प्रतिबंध (Climate Change and Mitigation) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेत सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील 85 विद्यार्थी आणी 9 शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हवामान बदल व त्याचे दुष्परीणाम याविषयी विद्यार्थी आणी शिक्षकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणी या गंभीर समस्येवर शिक्षण आणी विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून वनप्रबोधिनी चंद्रपूरचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री. उमेश वर्मा, अपर संचालक (प्रशिक्षण), श्री. एस. एस. दहीवले, सत्र संचालक श्री. एस के. गवळी, सत्र संचालक आणी श्री. खुशाल रामगीरकर, सत्र संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याचे महत्व पटवून दिले व शिक्षकांनी आणी विद्यार्थ्यांनी समाजात पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.

या कार्यशाळेत पर्यावरण व परीस्थितीकी, हवामान बदल कारणे व परिणाम त्यावरील प्रतिबंध व उपाय योजना (Mitigation Strategies), हवामान बदल रोखण्यासाठी वन व वन्यजीव संरक्षणाचे महत्व, टाकावू पदार्थाचे हरीत पर्यावरणपूरक नियोजन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेतील सहभागींकरीता श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन, येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध वनस्पती आणी त्यांची हवामान समतोल व कार्बन शोषणात भूमीका व जैवविविधतेचे महत्व समजावून घेण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी या हेतूने हा उपक्रम वन प्रबोधिीनीचे संचालक श्री.
एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हयातील सर्व शालेय संस्थामधील विद्यार्थ्यांकरीता अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आयोजीत करुन युवा पिढीचा पर्यावरण संवर्धनात सक्रीय सहभाग वाढविण्याकरीता वनप्रबोधिनी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन श्री. उमेश वर्मा, अपर संचालक (प्रशिक्षण) यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री. नरेंद्र चेटूले, श्री. कुमार पस्पुनुरवार आणी वनप्रबोधिनीतील इतर अधिकारी व कर्मचा-याचे सहकार्य लाभले.