

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : लोकशाहीर आण्णा भाऊ साठे योजना अंतर्गत सन 2023/24 चा निधी खाजगी ठिकाणी व इतर वापरून शासनाची फसवणूक केल्या बाबात फलटण नगरपरिषद फलटणचे मुख्याधिकारी व बांधकाम आभियंता यांच्या वर कारवाई करण्या बाबत भीम आर्मी संघटनेने जिल्हा अधिकारी तसेच विभागीय पालिका आयुक्त पुणे यांच्या निवेदन दिले. होते त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले.
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे योजना अंतर्गत समाज कल्याण सातारा यांचे कडील अर्ज मंजूरी सन 23/24/225E481 अंतर्गत मंजूरी 4,57,26,268 शासन निर्णय नमुद मंजूर असता फलटण नगर प्रभाक 1 मंगळवार पेठ येथील मटण मार्केट परिसर रस्ता विकसित करणे या साठी निधी 29,31,574/- रुपये वापरून दलित वस्ती सुधार योजनेचा निधी इतरत्र वापरला असुन . त्याच बरोबर , सोमवार पेठ प्रभाग 3 येथील कारखाना अंतर्गत खाजगी रोड विकसीत करता एक बाजू रक्कम 1,18,90,774/- निधीच्छा वापर केला आहे यांची दखल घेत जिल्हा अधिकारी यांनी पुरावे घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहे .
भीम आर्मी संघटने कडून सांगण्यात आले आहे की भष्टचाराला आळा बसवण्या साठी आणी कामा मध्ये पारदर्शकता निर्माण होण्यासाठी पुरावे सादर करणार असून हा लढा देशाला समाजाला घातक असणाऱ्याना विरोधी असुन त्यांना गजा आड केल्या शिवाय सोडनार नाही..



